मुंबई उच्च न्यायालयानं(Mumbai High Court) सोमवारी सुशांत सिंग राजपूत(Sushant Singh Rajput) केस प्रकरणात सिद्धार्थ पिठानीला(Siddharth Pithani) जामीन(Bail) मंजूर केला आहे. सिद्धार्थ पिठानी हा तोच आहे,जो अभिनेता सुशांत सिंग राजपूतसोबत त्याच्या फ्लॅट मध्ये राहत होता. सुशांत सिंग राजपूतनं २ जून २०२० रोजी आपल्या राहत्या(भाड्याच्या) घरात आत्महत्या(Suicide) केली होती. तेव्हा बातम्या होत्या की सिद्धार्थनेच पहिल्यांदा सुशांतला पंख्याला लटकलेल्या अवस्थेत पाहिल होतं. या प्रकरणात सुशांत सिंग राजपूतची कथित गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीचं नाव देखील आरोपींच्या यादीत सामिल आहे. ती सध्या जामीनावर बाहेर आहे. सुशांतचा मृत्यू हा ड्रग्जचं सेवन केल्यामुळे झाला या मुद्द्यानं त्यावेळी जोर पकडला होता आणि याच प्रकरणात पिठानीला देखील अटक करण्यात आली होती.(Sushant Singh Rajput's Flatmate Siddharth Pithani Gets Bail From Bombay High Court In Drugs Case)
सिद्धार्थ पिठानीला एनसीबीनं मे,२०२१ रोजी हैदराबाद येथून अटक केली होती. त्याला न्यायालयीन कोठडीत(Judicial Custody) ठेवण्यात आलं होतं. त्याला सुशांत प्रकरणात काही अन्य आरोपांसोबतच,कोणतीही गुंगीकारक औषधी द्रव्ये किंवा मनोव्यापारावर परिणाम करणाऱ्या पदार्थांचे सेवन म्हणजेच NDPS Act27(a) अंतर्गत आरोपपत्र दाखल करण्यात आलं होतं.
आपल्याला उगाचच या प्रकरणात फसवले जात असल्याचा दावा करत सिद्धार्थ पिठानीनं जामीनासाठी अर्ज केला होता. त्यानं आपल्या याचिकेत दावा केला होता की त्याच्याकडे कोणत्याही प्रकारचे ड्रग्ज सापडलेले नाही,ज्यावरनं तो या ड्रग्जची तस्करी करत असल्याचं सिद्ध होतं. सुनावणीनंतर न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या एकल पीठानं पिठानीला ५०,००० रुपयाच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे.
अभिनेता सुशांत सिंग राजपूतने जून,२०२० मध्ये आपल्या घरात आत्महत्या केली होती, एनसीबीनं(NCB) या प्रकरणाच तपास आपल्या हाती घेतल्यानंतर फिल्म जगतातील अनेकांना चौकशीसाठा बोलावणं धाडलं होतं. बॉलीवूडमध्ये ड्रग्जचं जाळं पसरल्याची मोठी खबर त्यावेळी एनसीबीला मिळाल्याचं म्हटलं गेलं होतं. यानंतर एनसीबीनं रिया चक्रवर्तीला देखील अटक केली होती, पण त्यानंतर तिची जामीनावर सुटका झाली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.