Sushmita Sen Informed that suffered a heart attack: स्वतःच्या शरीराची इतकी व्यवस्थित काळजी घेणारी सुश्मिता सेन जेव्हा म्हणाली की माझी एन्जियोप्लास्टी झाली आहे तेव्हा अनेकांच्या काळजात धस्स झालं असणार हे निश्चित.
सुश्मिता सेनविषयीची एक पोस्ट सध्या जोरदार व्हायरल होताना दिसत आहे. ज्यात सुश्मिता सेननं तिला काही दिवसांपूर्वी हार्टअटॅक आल्याचा मोठा खुलासा केला आहे. तिनं आपली एन्जियोप्लास्टी झाल्याचं देखील सांगितलं आहे.
सुश्मिता सेननं एका पोस्टच्या माध्यामातून ही माहिती दिली आहे. तिनं वडीलांसोबतचा एक फोटो शेअर करत लिहिलं की,''माझे वडील मला म्हणाले शोना तुझं मन आनंदी ठेवलंस,मजबूत ठेवलंस तर ते तुझ्या पाठीशी खंबीर उभं राहील जेव्हा तुला गरज असेल तेव्हा''.
''मला काही दिवसांपूर्वीच हार्टअटॅक आला होता. माझी एन्जियोप्लास्टी झाली आहे. आणि माझे कार्डिओलॉजिस्ट म्हणाले,तुझं हार्ट खूप मोठं आहे''. तिनं असं लिहित हार्ट इमोजी आणि स्माइली इमोजी देखील दिले आहेत.
पुढे सुस्मिता म्हणाली,''पण ही पोस्ट मी तुम्हाला चांगली बातमी द्यायला देत आहे. आता सगळं ठीक आहे आणि मी तयार आहे आणखी पुढील काही वर्ष चांगलं हेल्दी लाईफ जगण्यासाठी. तुम्हा सगळ्या चाहत्यांचा मी मनापासून आदर करत आणि तुमच्यावर प्रेमही करते. देवापेक्षा कुणी मोठा नाही..डुग्गा डुग्गा''.
सुश्मिताची ही पोस्ट काही वेळातच व्हायरल झाली. अन् तिच्या असंख्य चाहत्यांनी तिच्याविषयी काळजी व्यक्त केली. तिला लवकरच बरं होण्यासाठी शुभेच्छा देखील दिल्या. इतकं हेल्दी लाईफस्टाईल जगणाऱ्या सुश्मिता सेनला हार्टअटॅक आल्यानं अनेकजण आता नेमकं जगायचं कसं असा प्रश्न देखील करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.