Accident News Esakal
मनोरंजन

Accident News: बॉलिवूड अभिनेत्रीच्या कारची दुसऱ्या कारला धडक, अपघातात स्विस जोडप्याचा मृत्यू

शाहरुख खानच्या 'स्वदेश' चित्रपटातून डेब्यू करणारी बॉलिवूड अभिनेत्री गायत्री जोशीच्या कारला इटलीमध्ये अपघात झाला

अंकिता खाणे (Ankita Khane)

शाहरुख खानच्या 'स्वदेश' चित्रपटातून डेब्यू करणारी बॉलिवूड अभिनेत्री गायत्री जोशीच्या कारला इटलीमध्ये अपघात झाला आहे. यावेळी अभिनेत्री गायत्री जोशी पती विकास ओबेरॉयसोबत लॅम्बोर्गिनीमध्ये प्रवास करत होती. मात्र, दोघेही थोडक्यात बचावले आहे. मात्र या अपघातात फरारी कारमधून प्रवास करणाऱ्या स्विस जोडप्याचा मृत्यू झाला आहे.माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पुढील कारवाई सुरू केली.

वृत्तानुसार, इटलीच्या सार्डिनिया भागात हा अपघात झाला. घटनेच्या वेळी गायत्री आणि तिचा नवरा लॅम्बोर्गिनीमध्ये प्रवास करत होते. त्याच्या कारच्या मागे इतरही अनेक गाड्या होत्या. यावेळी पुढे जात असलेल्या मिनी ट्रकला ओव्हरटेक करत असताना त्यांची कार फरारीला धडकली आणि फरारी बाजूने चालणाऱ्या मिनी ट्रकला धडकली. या धडकेमुळे मिनी ट्रक उलटला आणि फरारीला आग लागली, त्यात प्रवास करणाऱ्या जोडप्याचा मृत्यू झाला आहे.

63 वर्षीय मेलिसा क्रौटली आणि 67 वर्षीय मार्कस क्रौटली अशी मृतांची नावे असून दोघेही स्वित्झर्लंडचे आहेत. गायत्रीने एका न्यूज वेबसाईटला सांगितले की, विकास आणि मी इटलीमध्ये आहोत. आमचा अपघात झाला. देवाच्या कृपेने आम्ही दोघेही पूर्णपणे बरे आहोत.

अपघाताचा एक व्हिडिओही समोर आला आहे, जो मागून येणाऱ्या वाहनाच्या डॅशबोर्डवर बसवलेल्या कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाला आहे. व्हिडिओ रेकॉर्डिंग करणाऱ्या वाहनाला एकामागून एक किती वाहने ओव्हरटेक करतात हे या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. त्यानंतर थोडं पुढे जात असताना एका मिनी ट्रकला ओव्हरटेक करताना कार धडकली, त्यामुळे कार आणि ट्रक दोन्ही पलटी झाले.

केवळ एका चित्रपटानंतर बॉलिवूडपासून दूर

गायत्री जोशीने 2004 मध्ये 'स्वदेस' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. शाहरुखसोबत तिने मुख्य भूमिका साकारली होती. तिच्या अभिनयाचेही खूप कौतुक झाले. मात्र, 'स्वदेश' हा एकच चित्रपट केल्यानंतर तिने अभिनयापासून दुर झाली आणि ओबेरॉय कन्स्ट्रक्शनचे व्यवस्थापकीय संचालक विकास ओबेरॉय यांच्याशी लग्न केले.

तेव्हापासून ती बॉलिवूडपासून दूर दिसली. तिने 1999 मध्ये फेमिना मिस इंडिया स्पर्धेत भाग घेऊन तिच्या करिअरला सुरुवात केली. पुढच्या वर्षी 2000 मध्ये, तिने मिस इंडिया इंटरनॅशनलचा किताब जिंकला, ज्यामुळे तिला जपानमध्ये मिस इंटरनॅशनल 2000 मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Government : मणिपूरचे राज्य सरकार अल्पमतात? ‘एनपीपी’ने पाठिंबा काढून घेतल्यानंतर काँग्रेस पक्षाचा दावा

IPL Mega Auction 2025: 'हे' ५ अनकॅप गोलंदाज होऊ शकतात करोडपती, फ्रँचायझींची असेल नजर

Tirupati Temple : तिरुपती मंदिरात बिगर हिंदू कर्मचाऱ्यांना कामास बंदी; ‘टीटीडी’ ट्रस्टच्या बैठकीत निर्णय

Sports Bulletin 19th November: दिल्ली कॅपिटल्सने रिटेन न करण्यावर ऋषभ पंतने सोडलं मौन ते रॉजर फेडररचं राफेल नदालला भावनिक पत्र

Vinod Tawde: ''विनोद तावडे आमचे राष्ट्रीय नेते आहेत, त्यांच्यावर हल्ला झालाय'' फडणवीस अखेर बोललेच

SCROLL FOR NEXT