Swara bhasker shares rahul gandhi heavy rain speech photo from bharat jodo yatra  Google
मनोरंजन

Swara Bhasker: राहुल गांधींसाठी स्वराचं ट्वीट चर्चेत, थेट शायरीतून व्यक्त केल्यात भावना..

राहुल गांधींनी काही दिवसांपूर्वी मुसळधार पाऊस सुरु असताना भिजतच सभेला संबोधित केलं अन् अभिनेत्री स्वरालाही त्यावर व्यक्त होण्याचा मोह आवरला नाही.

प्रणाली मोरे

Bhart Jodo Yatra: भारत जोडो यात्रा हे कॉंग्रेस पक्षाद्वारे सुरु केलेलं एक जन आंदोलन आहे, ज्या अंतर्गत राहुल गांधी अनेक राज्यांपर्यंतचा प्रवास हा पायीच करत आहेत. पक्षाला अधिक बळकट करण्यासाठी आणि लोकांमध्ये पक्षाच्या धोरणांप्रती जागरुकता आणण्यासाठी या 'भारत जोडो यात्रे'चं प्रयोजन करण्यात आलं आहे. राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वीच कर्नाटकातील म्हैसूर शहरात मुसळधार पाऊस सुरु असताना भिजत-भिजत सभेला संबोधित केल्याचं समोर आलं अन् त्याची चर्चा रंगली. पावसात भिजत भाषण देतानाचा त्यांचा फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला. आता बॉलीवूड अभिनेत्री स्वरा भास्करनं(Swara Bhasker) राहुल गांधी यांचा तो व्हायरल फोटो सोशल मीडियावर शेअर करत राहुल गांधींसाठी एक शायरी देखील पोस्ट केली आहे.(Swara bhasker shares rahul gandhi heavy rain speech photo from bharat jodo yatra)

स्वरा भास्करने राहुल गांधी यांचा पावसात भिजत भाषण देतानाचा फोटो ट्वीट करत कॅप्शनमध्ये लिहिलं आहे,'खूप मस्त फोटो! फोटोग्राफर कोण आहे?', तिनं लिहिलंय,'सदियों रहा है दुश्मन दौर ए जमां हमारा,कुछ बात है कि हस्ती मिटती नहीं हमारी-.एक सुंदर क्षण! तुमच्या ध्येयाला बळ मिळो राहुल गांधी!'

आता स्वराच्या या पोस्टनंतर नेटकऱ्यांनी तिच्या या ट्वीटवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. कोणी तिची शाळा घेतली आहे तर कोणी तिला पाठिंबा दिला आहे. काहींनी तर मजेदार मीम्स बनवून शेअर करायला सुरुवात केली आहे.

याआधी सलमान खानचा एक व्हिडीओ खूप व्हायरल झाला होता,ज्याविषयी दावा केला जात होता की त्यानं त्यातनं राहुल गांधींच्या 'भारत जोडो यात्रे'चं समर्थन केलं आहे. पण त्यानंतर स्पष्ट झालं की सलमानने हे गाणं २ वर्ष आधी ईदच्या निमित्तानं गाऊन हिंदू-मुस्लिम एकतेचा संदेश त्या माध्यमातून दिला होता. आणि त्याचा राहुल गांधी यांच्या 'भारत जोडो यात्रे'शी काहीच संबंध नव्हता.

स्वरा भास्कर नेहमीच आपल्या बिनधास्त अन् बेताल वक्तव्यांसाठी ओळखली जाते. ती जवळपास सगळ्याच विषयांवर आपलं मत व्यक्त करताना दिसते. आणि यासाठी तिला अनेकदा ट्रोल देखील केलं गेलंय. तिच्या सिनेमांविषयी बोलायचं म्हटलं तर तिचा 'जहां चार यार' सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला,ज्याला प्रेक्षकांचा फारसा काही प्रतिसाद मिळाला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anil Deshmukh: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर हल्ला; देशमुख गंभीर जखमी

Lawrence Bishnoi : बाबा सिद्दीकींच्या हत्येचा सूत्रधार अनमोल बिश्नोईला अमेरिकेत अटक

Mohol Assembly Election : अपक्ष उमेदवार क्षीरसागर यांनी दिला महाविकास आघाडीचे राजू खरे यांना पाठिंबा

43 Fours, 24 Sixes! आयुष शिंदेची Harris Shield स्पर्धेत ४१९ धावांची वादळी खेळी, वाचला सर्फराज खानचा विक्रम

Pune Assembly Eletion 2024 : मतदान केंद्रांच्या दोनशे मीटर परिसरात वाहने लावण्यास मनाई

SCROLL FOR NEXT