Taapsee Pannu reveals Rishi Kapoor shocked when he know about her south films. Google
मनोरंजन

तापसी पन्नूविषयी असं काय ऐकलं की दिवंगत Rishi Kapoor यांना बसला होता धक्का

तापसी पन्नूने एका मुलाखतीत याविषयी खुलासा केला आहे. 'चष्मेबहाद्दूर' या पदार्पणाच्या सिनेमात अभिनेत्रीनं Rishi Kapoor याच्यासोबत काम केले होते.

प्रणाली मोरे

तापसी पन्नू(Taapsee Pannu) हे सध्या बॉलीवूडमधलं चर्चेतलं नाव. तिनं जेवढे सिनेमे केलं त्यातील तिचा अभिनय म्हणजे एकदम दर्जा. अगदी लो बजेट सिनेमातून काम करुन तापसी पुढे आली आणि आज शाहरुख सोबत 'डंकी' सिनेमातून स्क्रीन शेअर करायला सज्ज झाली आहे. पण तिचा खरा प्रवास अभिनय क्षेत्रातला सुरु झाला तो साऊथ इंडस्ट्रीतून. जवळजवळ तिनं साउथ इंडस्ट्रीत एकूण १२ सिनेमे केले होते. बॉलीवूडमध्ये(Bollywood) तिने 'चष्मेबहाद्दूर' या सिनेमातून २०१३ साली पदार्पण केलं. Rishi Kapoor सारख्या दिग्ग्ज अभिनेत्यासोबत त्यावेळी तिनं त्या विनोदी धाटणीच्या सिनेमातून स्क्रीन शेअर केली होती. त्यावेळी त्यांना जेव्हा तापसीनं साऊथमध्ये ११ सिनेमे केल्याचं कळलं होतं तेव्हा ते खूप प्रभावित झाले होते,आणि चक्क तिला ज्येष्ठ पदाचा मान देत Veteran म्हणाले होते.(Taapsee Pannu reveals Rishi Kapoor shocked when he know about her south films.

तापसीनं साऊथ मध्ये २०१० साली तेलुगु सिनेमा 'झुम्मांडी नादम' मधून पदार्पण केलं होतं. त्यानंतर तिने कितीतरी तामिळ आणि तेलुगु सिनेमांतून काम केलं. अगदी प्रभास सोबतही तिनं 'मिस्टर.परफेक्ट' सिनेमात काम केलं आहे.

तापसीनं फिल्मफेअरला दिलेल्या एका मुलाखतीत म्हटलं होतं,''जेव्हा मी ९ वर्षांपूर्वी बॉलीवूडमध्ये आले होते,आणि माझा 'चष्मेबहाद्दूर' रिलीज झाला,तेव्हा मला सांगितलं गेलं की तुला तुझी साउथची इमेज पुसावी लागेल नाहीतर लोकं तुला तिकडचीच समजतील आणि तुझा स्विकार करणार नाहीत. तेव्हा मला वाटलं ,का मी पुसून टाकायची माझी तिथली ओळख, मी एवढं काम केलं आहे तिथे, आणि ते देखील खूप चांगल्या लोकांसोबत,खूप मोठ्या नावांसोबत मी सिनेमाच्या माध्यमातून जोडले गेलेय,तर मग मी असं का करू?''.

ती पुढे म्हणाली,''मला अजूनही आठवतं 'चष्मेबहाद्दूर'च्या सेटवर ,Rishi Kapoor यांनी मला विचारलं होतं,''तू साऊथमध्ये किती सिनेमे केले आहेस? मी म्हणाले १० आणि ११ व्या सिनेमात मी काम करतेय,आणि चष्मेबहाद्दूरचं शूट झालं की मग माझ्या १२ व्या साउथ सिनेमाच्या शूटला मी सुरुवात करेन''. मग त्यावर ते लगेचच म्हणाले,''अरे तू तर Veteran(ज्येष्ठ) आहेस. त्यांना धक्का बसला होता मी साउथ इंडस्ट्रीत एवढे सिनेमे केलेयत हे ऐकून''.

तापसी पन्नू हे नाव बॉलीवूडमध्ये मोठं झालं ते २०१५ मध्ये आलेल्या बेबी सिनेमातील तिच्या भूमिकेमुळे. भूमिका छोटी होती पण तापसी भाव खाऊन गेली होती. तापसीनं पिंक सिनेमात अमिताभ बच्चन यांच्यासोबत केलेलं कामही लक्षवेधी ठरलं. आणि त्यानंतर तिच्या करिअरची गाडी बॉलीवूडमध्ये सुसाट पळत सुटली. मुल्क,मनमर्झियां,थप्पड,हसिना दिलरुबा सारख्या सिनेमात तिनं साकारलेल्या भूमिकांनी तिला बॉलीवूडच्या टॉपच्या अभिनेत्रींच्या रांगेत बसवलं. आता तिचा क्रिकेटर मिथाली राज वर बायोपीक रिलीज झाला आहे. १५ जुलै २०२२ रोजी म्हणजे आज हा सिनेमा रिलीज झाला आहे. या सिनेमाविषयी अन् तापसी कडूनही तिच्या चाहत्यांना खूल अपेक्षा आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Purandar Assembly Election 2024 Result Live: तिरंगी लढतीत विजय शिवतारेंनी पुरंदरचा 'गड' राखला, संजय जगताप यांना धोबीपछाड

Sajid Khan Pathan won Akola West Election 2024: भाजपचा बालेकिल्ला काँग्रसने जिंकला! अकोला पश्चिममध्ये साजिद खान पठाण करणार 'राज्य'

Bramhapuri Assembly Election Results 2024 : ब्रह्मपुरीत विजय वडेट्टीवारांनी घातला विजय मुकुट! तब्बल 'इतक्या' मतांनी विजयी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यासाठी निघाले

Guhagar Assembly Election 2024 Results : गुहागरचा गड शिवसेना ठाकरे गटाच्या भास्कर जाधवांनी राखला; महायुतीच्या राजेश बेंडलांचा केला पराभव

SCROLL FOR NEXT