Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: Esakal
मनोरंजन

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: "ते माझ्या वडिलांच्या जागी", नट्टू काकाच्या आठवणीत बागा व्याकूळ! पोस्ट वाचून येईल डोळ्यात पाणी

Vaishali Patil

'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही मालिका गेल्या 14 वर्षापासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून ही मालिका सतत वादाच्या भोवऱ्यात आहे. अनेक कलाकारांनी या शोच्या निर्मात्यावर आरोप केले आहेत.

बरेच कलाकार हा शो सोडून गेले आहेत. मात्र काही खास कलाकरांची कमतरता आजही प्रेक्षकांना भासते. त्यातलचं एक मोठ नाव म्हणजे नट्टू काका उर्फ ​​घनश्याम नायक.

घनश्याम यांच्या नट्टू काका या पात्राने सर्वांना खळखळून हसवलं. घनश्याम नायक यांचे 3 ऑक्टोबर 2021रोजी निधन झाले. ते कॅन्सरशी झुंज देत होते. मात्र घनश्याम नायक यांच्या चाहत्यांना आजही त्यांची आठवण येतेच. आज मालिकेत बागाची भुमिका साकारणाऱ्या ​​तन्मय वेकारियाला नट्टू काकाची आठवण आली आहे. बाघा ​​आणि नट्टू काका यांची मजेदार जोडी प्रेक्षकांना खुप हसवायची. आजही चाहते या जोडीला मिस करतात.

तन्मय वेकारियाने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर करून त्याच्या लाडक्या नट्टू काकांना श्रद्धांजली वाहिली आहे. तन्मय वेकारिया आणि घनश्याम नायक हे एकमेकांसोबत शो मध्ये जेवढी मजा केली, तेवढीच त्यांची ऑफस्क्रीन बॉन्डिंगही तशीच होती.

3 ऑक्टोबर म्हणजेच आज घनश्याम नायक यांची पुण्यतिथी निमित्ताने त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आणि त्याच्या आठवणींना उजाळा दिला आहे. यासोबतच त्याने नट्टू काकांना श्रद्धांजली वाहिली.

तन्मयने शेयर केलेल्या या व्हिडिओमध्ये बागा आणि नट्टू काका यांच्यातील प्रेमळ जोडीची झलक पाहायला मिळतात.

या व्हिडिओ पोस्टमध्ये तो लिहितात की, "ते फक्त चांगले सह-अभिनेता नव्हते. ते एक खास मित्र होते, एका वडिलांची व्यक्तिरेखा , एक शुभचिंतक होते. असे व्यक्ती होते ज्याच्यासोबत मी खूप वेळ घालवला, सर्वात लोकप्रिय काका आणि पुतण्या जोडी... घनश्याम नायक एक दिग्गज अभिनेता होते ज्याच्यासोबत काम करायला तुम्हाला आवडते. त्यांच्या निधनाला 2 वर्षे झाली, पण ते अजूनही आमच्या हृदयात कायमचे आहेत."

सध्या तन्मयची हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. नेटकरी या व्हिडिओवर कमेंट करत नट्टू काकांची आठवण काढत आहेत.

घनश्याम नायक हे एक लोकप्रिय आणि दिग्गज कलाकार होते. त्यांनी केवळ टीव्हीच नव्हे तर चित्रपटांमध्येही काम केले होते. 'क्रांतीवीर', 'आंदोलन', 'बरसात', 'माफिया', 'बेटा', 'तिरंगा', 'आँखे', 'लाडला', 'चाहत', 'इश्क', 'चायना गेट', 'तेरे नाम' आणि 'खाकी'सह अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी चाहत्यांचे मनोरंजन केले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Closing: शेअर बाजार कोसळला; सेन्सेक्स 900 अंकांनी खाली, गुंतवणूकदारांचे 8.50 लाख कोटी रुपयांचे नुकसान

Latest Maharashtra News Updates Live : पुण्यात आचारसंहिता भंगाच्या ७१ तक्रारींची नोंद

IND vs NZ: केएल राहुलला मिळणार डच्चू अन् पुणे कसोटीत Shubman Gill करणार पुनरागमन? कोच म्हणाले...

Dr. Jayashree Thorat : वडिलांवर बोलाल तर तुमची जागा दाखवू ,संगमनेरमध्ये दडपशाही चालणार नाही

Diwali Recipe : गोड नेहमीच बनवताय, यंदा खारी शंकरपाळी ट्राय करा, फराळाची चवच बदलेल

SCROLL FOR NEXT