disha vakani 
मनोरंजन

'दयाबेन'ची अवस्था पाहून नेटकऱ्यांनी पतीला केलं ट्रोल

या फोटोमध्ये दिशाला ओळखणंही कठीण

स्वाती वेमूल

गेली कित्येक वर्षे प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी मालिका म्हणजे 'तारक मेहता का उल्टा चष्मा' Taarak Mehta Ka Ooltah Chashmah. या मालिकेमधील प्रत्येक भूमिकेला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. मालिकेत 'दयाबेन'ची Dayaben भूमिका साकारणारी अभिनेत्री दिशा वकानी Disha Vakani गेल्या काही वर्षांपासून मालिकेपासून दूर आहे. मालिकेपासून दूर राहिली तरी तिचा चाहतावर्ग कमी झालेला नाही. बाळंतपणासाठी दिशाने सुट्टी घेतली होती आणि पुन्हा ती मालिकेत परतलीच नाही. आता दिशाचा नवीन फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र या फोटोतील तिची अवस्था पाहून चाहते तिच्या पतीला ट्रोल करत आहेत.

या फोटोमध्ये दिशाला ओळखणंही कठीण आहे. यामध्ये तिच्या खांद्यावर लहान मुलगी झोपलेली पहायला मिळतेय. नो मेकअपच्या या लूकमध्ये तिच्या चेहऱ्यावरील थकवा स्पष्टपणे जाणवतोय. दिशाच्या एका फॅन पेजवर हा फोटो पोस्ट करण्यात आला आहे. अवघ्या काही तासांतच हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

'तारक मेहता..'मधील दयाबेनच्या भूमिकेमुळे दिशाला सर्वाधिक प्रसिद्धी मिळाली. याच प्रसिद्धीमुळे तिला अनेक जाहिरातींच्या ऑफर्स मिळाल्या. दिशाची एकूण संपत्ती ही जवळपास ३७ कोटी रुपये इतकं असल्याचं कळतंय. २०१५ मध्ये तिने मयूर पाडियाशी लग्न केलं. नोव्हेंबर २०१७ मध्ये दिशाने मुलीला जन्म दिला. तेव्हापासून ती मालिकेत परतलीच नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अमित शहांनी केले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे अभिनंदन

Shirdi Assembly Election 2024 Final Result Live: शिर्डीत विखे पाटलांनी राखली जागा! सोळाव्या फेरीनंतर काँग्रेसच्या घोगरेंचा पराभव निश्चित

Kolhapur South Assembly Election 2024 Results : कोल्हापुरात बंटी नाही, आता महाडिक पॅटर्न! ऋतुराज पाटलांचा पराभव करत अमल महाडिकांचा दणदणीत विजय

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: भाजपचे शिवाजी कर्डिले १४९८४ मतांनी आघाडीवर.

Eknath Shinde Reaction : एकनाथ शिंदेंची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया, लाडक्या बहिणींमुळे...

SCROLL FOR NEXT