'तारक मेहता का उल्टा चष्मा'(Tarak Mehta Ka Ooltah Chashmah) ही मालिका गेल्या काही दिवसांपासून अनेक गोष्टींमुळे चर्चेत आहे. शो मधून अचानकपणे कलाकारांनी घेतलेली एक्झिट,शो मध्ये नव्या कलाकारांची एन्ट्री अशा अनेक गोष्टी 'तारक मेहता' शो च्या बाबतीत घडत होत्या. निर्माते असित मोदी यांनी तर मालिकेतील प्रसिद्ध कॅरेक्टर दयाबेनला परत आणण्याचं वचनच प्रेक्षकांना दिलं होत. गेल्या अनेक दिवसांपासून,'दिशा वकानीला परत आणण्याचा प्रयत्न आम्ही करतोय', नंतर 'ती येणार नसली तरी तिच्या तोडीची अभिनेत्री आम्ही आणतोय' असं निर्माते सांगत सुटले होते. नवीन दयाबेन शोधण्यासाठी ऑडिशन सुरु आहे आणि राखी विजन या हॉट अभिनेत्रीचं नाव जवळजवळ फायनल झालं आहे असं देखील निर्मात्यांनी सांगितलं होतं. पण आता हे सगळं झालं जुनं,नवीन दयाबेन आणि तारक मेहतांचा शोधच पॉझ मोडवर गेल्याचं कळत आहे. आता निर्मात्यांनी या नव्या शोधाविषयी बोलण्याचंही थांबवलं आहे. म्हणजे आता दयाबेन तारक या व्यक्तीरेखांची सध्यातरी मालिकेत एन्ट्री होणं कठीण दिसतंय.(Dayaben and Taarak casting in ' goes into Pause Mode)
एवढंच नाही तर मालिकेचे निर्माचे असित मोदी यांनी मालिकेत टप्पू ची भूमिका साकारणारे राज अदाकत,ज्यांनी अधिकृतरित्या मालिका सोडली हे अद्याप जाहिर केलेलं नाही पण गेल्या तीन महिन्यापासून शूटिंगसाठी सेटवर का येत नाहीत यावरही स्पष्टिकरण देण्याकडे कानाडोळा केला आहे.
तसंच,आता प्रश्न हा देखील उभा राहिला आहे की मालिकेतील प्रसिद्ध व्यक्तिरेखा 'तारक', जी शैलेश लोढा साकारत होते,त्यांनी दोन महिन्यापूर्वीच शो मधून एक्झिट घेतली आहे,तरी त्या भूमिकेसाठी देखील नवीन कलाकार घेण्यावर हालचाली थांबवल्या आहेत.
हे सगळे प्रश्न मालिकेत सध्या काम करणाऱ्या इतर कलाकारांच्या डोक्यातही सुरु आहेत. महत्त्वाच्या व्यक्तिरेखा शो मध्ये नाहीत, पुन्हा नवीन कलाकार येण्याची चिन्ह दिसत नाहीत त्यामुळे नेमकं काय सुरु आहे याबाबतीत या शो मध्ये राहिलेल्या कलाकारांच्या डोक्यात संभ्रम सुरू आहे.
आता बातमी अशीही कळतेय की दयाबेन,तारक या व्यक्तीरेखांसाठी सुरु असलेल्या ऑडिशन्स पॉझ मोडवर जाण्याचं कारण आहे की अजूनही निर्माते असित मोदींना वाटत आहे की त्यांच्या बोलवण्यावर दिशा वकानी आणि शैलेश लोढा म्हणजे जुनी दयाबेन अन् जुना तारक परत येतील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.