Taiwan तैवान आणि चीनमध्ये सध्या वातावरण गंभीर आहे,यांच्यातील बिघडलेले संबंध सध्या न्यूजच्या हेडलाईन्समध्ये स्थान मिळवून आहेत. चीनने तैवानला चांगलंच कोंडीत पकडलं आहे. पण तुम्हाला माहित आहे, एक अशी गोष्ट आहे ती दोन देशांना प्रेमाने जोडण्याचं देखील काम करते आणि तो म्हणजे सिनेमा. तैवान आणि भारतामध्ये एक खास कनेक्शन आहे. आणि ते आहे भारतीय सिनेमा (Indian Movie) विषयी तैवानवासियांचे प्रेम.(Taiwanese minister Joseph Wu in love of Prabhas Baahubali and Indian Movies)
आपल्याला अर्थात हे वाचल्यावर थोडंस आश्चर्य वाटेल,पण हे सत्य आहे. तैवानमध्ये भारतीय सिनेमांविषयी क्रेझ पहायला मिळते. तैवानचे विदेश मंत्री जोसेफ व्हू हे तर भारतीय सिनेमांविषयी आपल्या प्रेमाची जाहीर कबूली देऊन मोकळे झाले आहेत.
काही वर्ष आधी तैवानच्या विदेश मंत्र्यांनी एका मुलाखतीत भारतीय सिनेमांविषयीचं आपलं प्रेम जाहीरपणे कबुल केलं होतं. त्यांनी सांगितलं होतं की,''तैवानमध्ये भारतीय सिनेमे खूप प्रसिद्ध आहेत,तिथली जवळपास सर्वच लोक भारतीय सिनेमे मोठ्या आवडीने पाहतात''. जोसेफ व्हू यांनी त्यांच्या आवडीचा भारतीय सिनेमा कोणता याचं उत्तर देताना बाहुबलीचं नाव घेतलं होतं.
जोसेफ व्हू यांनी म्हटलं होतं की, ''जेव्हा पण मी टी.व्ही वर बाहुबली सिनेमा पाहतो,तेव्हा-तेव्हा मी माझ्या पत्नीला म्हणतो,चुकूनही चॅनल बदलू नको,कारण प्रत्येकवेळेला मी तो सिनेमा पूर्ण पाहतो. मला नाही माहित की मी कितीवेळा हा सिनेमा पाहिलाय. भारतीय सिनेमे पाहण्यात खूप मजा आहे''.
जोसेफ व्हू यांचा बॉलीवूडचा परफेक्शनिस्ट आमिर खानचा दंगल सिनेमाही फेव्हरेट आहे. त्यांनी या संदर्भात म्हटलं होतं की,त्यांच्या देशात दंगल आणि हिंदी मिडीयम सिनेमे खूप प्रसिद्ध आहेत. जोसेफ व्हू यांचे म्हणणे होते की, तैवानमध्ये मोठ्या प्रमाणात भारतीय सिनेमे दाखवले जातात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.