Tamil actor Sarath Babu passes away at 71: दाक्षिणात्य मनोरंजन विश्वातील दिग्गज अभिनेते सरथ बाबू यांचे आज म्हणजेच 22 मे रोजी वयाच्या 71 व्या वर्षी निधन झाले. सरथ बाबूच्या कुटुंबीयांनी त्यांच्या मृत्यूची पुष्टी केली आहे, वयाशी संबंधित आजारांमुळे त्यांच्यावर हैदराबादच्या एआयजी रुग्णालयात उपचार सुरू होते.
सरथ बाबू यांना रुग्णालयात दाखल करून एक महिन्याहून अधिक काळ झाला होता. सोमवारी सकाळी त्यांची तब्येत अचानक बिघडली आणि अनेक अवयव निकामी झाल्याने त्याच्यावर उपचार सुरु होते. दुपारी त्यांचे निधन झाले. सरथ बाबू यांची गणना दक्षिणेतील दिग्गज अभिनेत्यांमध्ये होते, त्यांची फॅन फॉलोइंग केवळ भारतातच नाही तर जगभरात होती.
सरथ बाबू यांचे अनेक अवयव निकामी झाल्याचे सांगण्यात येत आहे. सरथ बाबू हे सेप्सिस या आजाराने त्रस्त आहे. त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना 20 एप्रिल रोजी बेंगळुरूहून हैदराबादला आणण्यात आले होतं.
सरथ बाबू यांचा जन्म 31 जुलै 1951 रोजी आंध्र प्रदेशातील अमदलावलसा येथे झाला होता.
क्रिमिनल (1994), उठी पुक्कल (1979) आणि शिर्डी साई (2012) यांसारख्या हिट चित्रपटाच्यामाध्यामातुन ते लोकप्रिय झाले.
सरथ यांनी 1973 मध्ये आलेल्या 'राम राज्यम' या सिनेमातून फिल्म इंडस्ट्रीमध्ये करिअरला सुरुवात केली. 2017 च्या 'मलयान' चित्रपटातील अभिनयासाठी त्याला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा तामिळनाडू राज्य पुरस्कारही देण्यात आला.
ते मुख्यत्वे तेलुगू आणि तमिळ चित्रपटांमधील कामासाठी ओळखले जातात. सरथने काही कन्नड, मल्याळम आणि हिंदी चित्रपटांमध्येही काम केले. त्याला नऊ वेळा सहाय्यक भूमिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा नंदी पुरस्कार मिळाला आहे.
सरथ बाबूच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचे तर त्यांनी 1974 मध्ये अभिनेत्री रमा प्रभाशी लग्न केले. त्यांचे लग्न 14 वर्षे टिकले आणि 1988 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. नंतर त्यांनी 1990 मध्ये स्नेहा नांबियारशी लग्न केले पण त्यांचाही 2011 मध्ये घटस्फोट झाला.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.