बेंगळुरूमधील झोमॅटो डिलिव्हरी बॉयच्या प्रकरणात आता अभिनेत्री तनुश्री दत्तानेही उडी घेतली आहे. डिलिव्हरी बॉयची बाजू घेणाऱ्या सेलिब्रिटींवर तनुश्रीने राग व्यक्त करत, तुम्ही घटनास्थळी हजर होता का, असा सवाल केला. तनुश्रीने इन्स्टाग्रामवर याविषयी भलीमोठी पोस्ट लिहिली आहे. त्यात तिने अभिनेत्री परिणिती चोप्रालाही प्रश्न विचारला आहे. गेल्या आठवड्यात बेंगळुरूमध्ये ऑर्डर रद्द केल्यामुळे तरुणीवर हल्ला केल्याच्या आरोपावरून झोमॅटो या फूड डिलिव्हरी कंपनीच्या डिलिव्हरी बॉयला अटक करण्यात आली. सोशल मीडियावर यावरून अनेक मतमतांतरे पाहायला मिळत आहेत. त्यातच परिणितीने संबंधित डिलिव्हरी बॉयची मदत करण्याचं आवाहन केलं. त्यावरून आता तनुश्रीने तिला आणि इतरांनाही खडेबोल सुनावले आहेत.
'जे पुरुष महिलांवर अत्याचार किंवा हल्ला करतात, ते शिक्षेच्या भीतीने कधीच गुन्हा कबूल करत नाही. स्वत:ची सुटका करून घेण्यासाठी ते रडतील, विनंती करतील आणि जे जमेल ते सर्व करतील. भारतीय न्यायव्यवस्थेत कोणत्याच पुरुषााने त्याचा गुन्हा कबूल केलेला नाही. जर त्या महिलेनं त्याला पैसे दिले नाहीत, ऑर्डर परत दिली नाही, शिवीगाळ केली आणि त्याला चपलेनं मारलं तर तो पोलिसांकडे का गेला नाही? पब्लिसिटी स्टंटसाठी ती स्वत:लाच मारून घेणार का? जर ती खोटारडी आहे असं म्हटलं जातंय तर तो डिलिव्हरी बॉय तिच्या दुखापतीचा खर्च का उचलतोय? या प्रकरणात अचानक काही सेलिब्रिटी त्या डिलिव्हरी बॉयच्या मदतीला धावून येतात. मला त्यांना विचारायचं आहे की, हे लोक घटनास्थळी हजर होते का, त्यांना माहितीये का तिथे काय झालं आणि ४.५ रेटिंगमुळे एखादा व्यक्ती सभ्य होतो का' असे अनेक प्रश्न तनुश्रीने तिच्या पोस्टमध्ये विचारलंय. या पोस्टच्या अखेरीस तिने या फूड डिलिव्हरी सर्व्हिसला अनसबस्क्राइब करत असल्याचंही स्पष्ट केलं.
काय आहे डिलिव्हरी बॉयचा आरोप?
ट्रॅफिकमुळे डिलिव्हरी करण्यास मला थोडा उशीर झाला होता. त्यामुळे मी त्यांची माफी मागितली. पण त्या महिलेनं मला डिलिव्हरीचे पैसे देण्यास नकार दिला. नंतर मला झोमॅटो सपोर्ट स्टाफकडून ऑर्डर रद्द झाल्याचं समजलं. त्यांना मी ऑर्डर परत मागितली तर त्यांनी त्यासही नकार दिला. अखेर मी ऑर्डर परत न घेताच इमारतीमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला, त्याच वेळी त्यांनी मला चपलेनं मारायला सुरुवात केली. मी स्वत:चा बचाव करत असताना त्यांच्या हातातील अंगठी त्यांच्याच नाकाला लागली आणि रक्तस्त्राव सुरू झाला.
संबंधित महिलेविरोधात गुन्हा दाखल
आता डिलिव्हरी बॉयच्या तक्रारीनंतर संबंधित महिलेवर बेंगळुरूच्या इलेक्ट्रॉनिक सिटी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.