Tanushree Dutta Trolled Social media : बॉलीवूडची अभिनेत्री तनुश्री दत्ता ही तिच्या अभिनयापेक्षा बाकीच्या गोष्टींमुळे जास्त चर्चेत आलेली सेलिब्रेटी आहे. तिचे चित्रपट ज्या वेगानं आले त्याच वेगानं ते निघूनही गेले. आशिक बना ये अपने मधून तनुश्री थोडीफार लाईमलाईटमध्ये आली खरी, पण त्यानंतर तिला फारशी संधी मिळाली नाही.
तनुश्रीला तिच्या बोलण्याचा कित्येकदा मोठा फटका बसला आहे. प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर तिनं केलेले मी टू चे आरोप यावरुन अभिनेत्रीवर नेटकऱ्यांनी, चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. तिला ते आऱोप सिद्ध करता आले नाही. मात्र त्यावरुन तिच्याविषयी वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चांना उधाण आल्याचे दिसून आले. आता पुन्हा तनुश्रीनं परखडपणे तिची भूमिका मांडली आहे.
Also Read - Adhik Shravan Maas : अधिक श्रावण मास चित्तशुद्धीचा पर्वकाळ
विषय कोणता का असेना तनुश्री ज्यावेळी बोलते तेव्हा तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. इंस्टाग्राम लाईव्ह चॅटवेळी तिनं काशीविश्वनाथला गेल्यानंतरचा एक अनुभव सांगितला आहे. त्यात तिला ज्यांनी ट्रोल केले त्यांना अभिनेत्रीनं चांगलेच सुनावलं आहे. हल्ली कित्येक सेलिब्रेटी सोशल मीडियाच्या आधारे चाहत्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतात. तनुश्री देखील त्यापैकी एक. मात्र तिला यावेळी वेगळी भूमिका घ्यावी लागली आहे.
मी जेव्हा काशीविश्वनाथ मंदिरात गेले तेव्हा मला खूपच छान वाटले. तो आनंद शब्दांत सांगता येणार नाही. मात्र काहींनी मला ट्रोल केले याचे वाईट वाटते. मी पहिल्यांदा काही बोलले नाही. ट्रोलर्स जर सातत्यानं अशा प्रकारच्या प्रतिक्रिया देणार असतील तर मग त्यांना काही गोष्टी आवर्जून सांगणे महत्वाचे आहे. त्यामुळे मी त्यांना आता सांगते की, तुम्ही तुमचा मेंदू स्वच्छ ठेवा, तसं केल्यास तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी स्वच्छपणे दिसतील.
यापूर्वी देखील तनुश्रीला तिच्या पोस्टवरुन नेटकऱ्यांनी ट्रोल केल्याचे दिसून आले होते. मात्र तिनं कुणाचे काही न ऐकता आपल्याला जे खरे वाटते ते युझर्सला सांगत कोणत्याही कारणावरुन ट्रोल करणे चुकीचे असल्याचे म्हटले होते. तुम्ही काय म्हणता यानं मला काहीही फरक पडत नाही. मी त्याचा फारसा विचारही करत नाही. तुमचं माझ्याविषयी काय मत यालाही मी जुमानत नाही. मला काय वाटते हे जास्त महत्वाचे आहे. अशी प्रतिक्रिया तनुश्रीनं दिली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.