Tarak Mehta Ka ooltah chashmah disha vakani: टीव्ही मनोरंजन विश्वात तारक मेहता या मालिकेनं लोकप्रियतेचे सर्व उच्चांक मोडले. या मालिकेत दयाबेनची भूमिका करणाऱ्या दिशा वकानींची लोकप्रियता प्रचंड आहे. गेल्या काही महिन्यांपासून त्या या मालिकेपासून लांब आहे. आज ना उद्या त्या मालिकेमध्ये दिसतील असा अंदाज नेटकऱ्यांनी व्यक्त केला आहे. अशावेळी त्याच मालिकेतील शैलेश लोढा यांची व्हायरल झालेली पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे.
तारक मेहतामध्ये काम करणारे प्रसिद्ध कलाकार शैलेश लोढा यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेयर केली आहे. त्यामध्ये वेगळ्या अंदाजात त्यांनी तारक मेहतामध्ये चाललेल्या परिस्थितीविषयी सांगितले आहे. लोढांनी दिशा वकानीविषयी केलेल्या वक्तव्यामुळे त्या आता पुन्हा तारक मेहतामध्ये दिसणार नसल्याचे चाहत्यांनी म्हटले आहे. शैलेश यांनी यावेळी आपल्या मनातील भावना व्यक्त करण्यासाठी शायरी पोस्ट केली आहे त्यामध्ये ज्यानं कुणी ती मालिका सोडली त्याकडे पुन्हा मागे वळून पाहिले नाही. असे म्हटले आहे.
काय आहे कारण, खरच दिशा परत येणार नाही?
शैलेशचे ते पत्र सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहे. त्या पत्रातील शेवटच्या ओळी अशा आहेत की, ज्यांनी ही मालिका सोडली आहे त्यांनी पुन्हा त्यात परतण्याचा विचार केलेला नाही. त्यामुळे मला वाटत नाही की, दिशाजी पुन्हा या मालिकेमध्ये येतील. सोशल मीडिया युझर्सला असे वाटते की, शैलेशजींनी ही गोष्ट असित मोदी यांना उद्देशुन वापरली आहे. त्यांनी देखील काही दिवसांपूर्वी तारक मेहताची मालिका सोडली होती. ते अजुनही परतले नाहीत. शैलेश यांच्या त्या पोस्टमुळे अनेकांनी दिशा वकानी पुन्हा येणार नसल्याचे म्हटले आहे
* तीन वर्षांपासून दिशा गायब....
गेल्या तीन वर्षांपासून दिशा वकानी ही त्या मालिकेतून गायब असल्याचे सांगितले आहे. दरवेळी ती पुढील महिन्यात शो मध्ये दिसणार असल्याचे मेकर्स सांगतात. मात्र अजुनपर्यत दिशा ही तारक मेहतामध्ये दिसली नाही. आपल्या वैयक्तिक कारणास्तव तिनं या मालिकेपासून फारकत घेतल्याचे सांगितले जाते. दुसरीकडे मेकर्ससोबत आर्थिक कारणामुळे आलेल्या वितुष्टामुळे दिशानं टोकाचे पाऊल उचलल्याची चर्चा आहे. मॅटरर्निटी लिव्हवर गेलेली दिशा ही अजुनपर्यत दिशा परत न आल्यानं अनेकंनी आश्चर्य व्यक्त केले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.