'tarak mehta ka ulta chashma' team apologised about lata mangeshkar's song  sakal
मनोरंजन

'तारक मेहता'च्या टीमने मागितली जाहीर माफी.. घडली मोठी चूक..

हिंदीतील लोकप्रिय मालिका 'तारक मेहता हा उलटा चश्मा' या मालिकेच्या टीमने चुकीचा संदर्भ दिल्याने नुकतीच जाहीर माफी मागितली.

नीलेश अडसूळ

Tv entertainment news : अवघ्या जगाला वेड लावणारी एक मालिका गेली १५ वर्षे सातत्याने सुरु आहे, ती म्हणजे सब वाहिनीवरील 'तारक मेहता का उलटा चश्मा'. (taarak mehta ka ooltah chashmah) लहान मुलांपासून ते घरातल्या आजी आजोबांपर्यंत प्रत्यकाला भावणारी अशी ही मालिका आहे. कित्येक घरांमध्ये दिवसरात्र हीच मालिका पहिली जाते. राष्ट्रीय एकात्मकता या संकल्पनेतून साकारलेली या मालिकेतील गोकुलधाम सोसायटी (gokuldham society) आता जवळपास अनेकांच्या आयुष्याचा घटक बनली आहे. पण नुकतीच या मालिकेच्या टीमकडून एक मोठी चूक घडली.

'तारक मेहता का उलटा चश्मा या मालिकेने आजवर प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले. केवळ विनोदच नाही तर अनेक सामाजिक विषयांवर भाष्य करणारी ही मालिका आहे. देशांतील विविध धर्माचे, प्रांताचे सण उत्सवही इथं आनंदाने साजरा होतात. या मालिकेतील 'दयाबेन' हे पात्र गेली काही वर्षे नसतानाही ही मालिका अविरत सुरु आहे. पण प्रेक्षकांचे मनोरंजन करताना या मालिकेकडून मोठी चूक झाली आहे. सोमवारी प्रक्षेपित झालेल्या भागात लता मंगेशकर यांच्या गाण्याबाबत चुकीचा संदर्भ देण्यात आला. चाहत्यांनी ही चूक निर्मात्यांच्या लक्षात आणून दिल्यांनतर मालिकेच्या टीमने चाहत्यांची माफी मागितली.

सोमवारी प्रसारित झालेल्या भागात गोकुळधाममधील सर्व सदस्य सोसायटीच्या क्लबमध्ये एकत्र जमलेले असतात. यावेळी जुन्या काळातील गाणी ऐकत त्यावर गप्पा गोष्टी सुरु असतात. अशात लता मंगेशकर (lata mangeshkar) यांचं ‘ए मेरे वतन के लोगों’ हे गाणं सुरु होतं. या गाण्यावर बोलताना मिस्टर भिडे म्हणतात, हे गाणं १९६५ मध्ये प्रदर्शित झालं होतं . हे गाणं ऐकून त्यावेळचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचेही डोळे पाणावले होते.'

इथेच मोठी चूक घडली. या गाण्याच्या प्रदर्शनाची चुकीची तारीख मालिकेत सांगितली गेली. त्यामुळे सोशल मीडियावर मालिकेला बरेच ट्रोल केले गेले. त्यानंतर 'तारक मेहता' च्या संपूर्ण टीमने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत आपल्या या चुकीची माफी मागितली आहे. ‘आम्ही आमचे शुभचिंतक, चाहते आणि प्रेक्षक यांची माफी मागू इच्छितो. आजच्या एपिसोडमध्ये आम्ही ‘ए मेरे वतन के लोगों’ गाण्याच्या प्रदर्शनाची तारीख १९६५ असल्याचं म्हटलं होतं. पण हे गाणं २६ जानेवारी १९६३ मध्ये प्रदर्शित झालं होतं. आम्ही आमची चूक मान्य करतो आणि पुन्हा अशी चूक होणार नाही याची काळजी घेऊ,' अशी ही पोस्ट आहे. पुढे 'तुमचा असित मोदी आणि तारक मेहताची संपूर्ण टीम' असे लिहिले आहे. या मालिकेचे निर्माते असित मोदी आणि संपूर्ण टीमने ही दिलगिरी व्यक्त केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: हितेंद्र ठाकूरांचा गड कोसळला; पालघर जिल्ह्यात महायुतीचा दबदबा वाढला

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सचिन पाटील 13327 मतांनी आघाडीवर

Satara-Jawali Assembly Election 2024 Results : साताऱ्यात भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले 1 लाख 40 हजार 120 मतांनी विजयी; राज्यात रेकॉर्डब्रेक मताधिक्य

Ambegaon Assembly Election 2024 result live: दिलीप वळसे-पाटील आठव्यांदा आमदार होणार; शिष्य देवदत्त निकम पराभूत

Maharashtra Election 2024: प्रविण दरेकरांचा 'तो' दावा खरा ठरला! राज्यात महायुतीचेच सरकार येणार

SCROLL FOR NEXT