TDM Movie actor pruthviraj got kicked out twice on Kapil Sharma show set sakal
मनोरंजन

TDM Movie: कपिल शर्माच्या सेटवरून दोनदा हाकललं.. आज 'तो'च मुलगा झालाय चित्रपटाचा नायक..

ऑफिस बॉय ते अभिनेता.. पृथ्वीराजचा संघर्षमय प्रवास..

नीलेश अडसूळ

actor pruthviraj thorat :मुंबई ही मायानगरी आहे. नशीब आजमवण्यासाठी इथे बऱ्याच क्षेत्रातली लोक येतात. स्वप्नांना सत्यात उतरवण्यासाठी येईल त्या अडथळ्यांना सामोरं जाण्याची दिशा मुंबईनगरी देते. अशा या मुंबईनगरीत सिनेसृष्टीत काम करण्याची जिद्द उराशी बाळगून कित्येकजण जीवाची अहोरात्र करतात.

त्यांचा हा प्रवास ऐकण्यासारखा असतो. असाच एक प्रवास नवख्या कलाकाराचा म्हणजेच 'टीडीएम' फेम अभिनेता पृथ्वीराजचा आहे. त्याने सांगितलेल्या प्रवासाचं वर्णन जरी केलं तरी अंगावर काटे येतात.

(TDM Movie actor prithviraj got kicked out twice on Kapil Sharma show set)

सिनेसृष्टीतल्या कामाची आवड होती म्हणून पृथ्वीराजने पुणे ते मुंबई प्रवास गाठला. मुबईतल्या फिल्मसिटीमध्ये सेटवर होणाऱ्या हालचालींना पाहण्याची उत्सुकता, तिथे होणाऱ्या तांत्रिक घडामोडी, तिथला माहोल आणि अभिनयाची आवड हे सार काही शांत बसू देत नव्हतं.

याबाबत बोलताना पृथ्वीराजने सांगितलेला किस्सा ऐकून विश्वास बसणार नाही, ''दोन चारदा कपिल शर्मा शोला प्रेक्षक म्हणून जाण्याचा मी प्रयत्न केला मात्र तिथवर पोहोचवणार माझ्या ओळखीतल कुणी नसल्यानं मला तिथून हाकलून देण्यात आलं.

पुढे तो म्हणाला,''शेवटी एके दिवशी पुन्हा मी तो सेट गाठला आणि सेटवर काम करणाऱ्या एका काकांना खूप लांबून हा शो बघण्यासाठी आलोय असं सांगितलं. त्यांनाही माझी दया आली असावी तेव्हा त्यांनी मला त्या शोच्या व्यवस्थापकापर्यंत पोहोचवलं आणि त्याच्या हातापाया पडून मी तो शो लाईव्ह पाहिलाच.''

अभिनय सृष्टी बाबतची त्याची स्वप्न ही त्याला शांत बसू देत नव्हती. आज याच पृथ्वीराजने आपल्या स्वप्नांना आकार देत प्रेक्षकापासून नायकापर्यंतचा त्याचा प्रवास पूर्ण केला आहे. एका नामवंत दिग्दर्शकाच्या चित्रपटात मुख्य भूमिका साकारायला मिळणं ही त्याच्यासाठी पर्वणीच आहे.

आज 'टीडीएम' चित्रपटामुळे पृथ्वीराज 'चारो तरफ छा गया है' असं म्हणणं वावगं ठरणार नाही. पूर्वीच्या हिंदी चित्रपटांमध्ये एक हुकमी डायलॉग होता, वक्त बदलने मे देर नहीं लगती….’अगदी तसेच घडलंय या पृथ्वीराजच्या बाबतीत.

दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडेंनी या नवख्या कलाकारांना दिलेली संधी सोने पे सुहागा है. 'ख्वाडा', 'बबन' चित्रपटानंतर दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांच्या 'टीडीएम' चित्रपटातून पृथ्वीराज चित्रपटसृष्टीत पाऊल टाकण्यास सज्ज झाला आहे. प्रेक्षक मग ऑफिस बॉय पासूनचा त्याचा नायका पर्यंतचा प्रवास अर्थात वाखाणण्याजोगा आहे.

'चित्राक्ष फिल्म्स' आणि 'स्माईल स्टोन स्टुडिओ' प्रस्तुत 'टीडीएम' चित्रपट येत्या २८ एप्रिलला संपूर्ण महाराष्ट्रात धुमाकूळ घालण्यास सज्ज होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Georai Crime : बुधप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

Bharat Global Developers : बोनस आणि स्टॉक स्प्लिटचा डबल धमाका, कोणता आहे हा शेअर ?

Belrise Industries IPO Launch : बेलराईज इंडस्ट्रीज आणणार 2150 कोटीचा आयपीओ, डिटेल्स जाणून घ्या...

Udgir Assembly Elecion Result : पंचवीस टेबल, २६ राऊंडमध्ये होणार मतमोजणी; बारा वाजेपर्यंत ट्रेंड हाती येणार

Ramchandra Ingawale : राजकारणाचा नुसता चिखल झालाय; भूगावमधील १०९ वर्षीय रामचंद्र इंगवलेंची व्यथा

SCROLL FOR NEXT