Aflatoon Tejaswini Lonari News: मराठी सिनेसृष्टीतील ग्लॅमरस अभिनेत्री तेजस्विनी लोणारी हिचा बेधडक डॅशिंग अंदाज लवकरच पहायला मिळणार आहे.
वेगवेगळ्या भूमिकांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केल्यानंतर तेजस्विनी पोलिसी गणवेश चढवत आगामी ‘अफलातून’ या मराठी चित्रपटात आलिया सावंत या डॅशिंग पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे.
'अ डिफेक्टीव्ह कॅामेडी' असं म्हणत लेखक, दिग्दर्शक परितोष पेंटर यांनी हा धमाल विनोदी चित्रपट प्रेक्षकांसाठी आणला आहे.
(tejaswini lonari first time will played goa police in upcoming film aflatoon marathi movie)
आपल्या भूमिकेबद्दल बोलताना तेजस्विनी सांगते की, 'माझं यातलं व्यक्तिमत्व गोवन आहे. शांत, संयमी पण वेळप्रसंगी आपला खाक्या दाखवत चोख कामगिरी बजावणारी पोलीस अधिकारी आहे. माझ्या आजवरच्या भूमिकांपेक्षा वेगळी भूमिका मला करायला मिळाल्याचा आनंद आहे.
विशेष म्हणजे गोव्याची भाषा, त्याचा लहेजा हे सगळं करण्यात एक वेगळीच मजा आली. प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करणारा ‘अफलातून’ हा चित्रपट आहे.
साहा अँड सन्स स्टुडिओज,आयडियाज द एंटरटेन्मेन्ट कंपनी आणि राजीव कुमार साहा चित्रपटाचे निर्माते आहेत.
ग्रुप एम मोशन एंटरटेन्मेन्ट, अवधूत डिस्ट्रिब्युटर आणि स्वर्ण पट कथा यांच्या संयुक्त विद्यमाने ‘अफलातून’ चित्रपटाची सहनिर्मिती करण्यात आली आहे.
‘अफलातून’ चित्रपटाची कथा-पटकथा परितोष पेंटर यांची असून संवाद संदीप दंडवते यांचे आहेत. छायांकन सुरेश देशमाने तर संकलन सर्वेश परब यांचे आहे.
मंदार चोळकर याने लिहिलेल्या गीतांना अवधूत गुप्ते आणि वैशाली सामंत यांचा स्वरसाज लाभला आहे.
संगीताची जबाबदारी संगीतकार कश्यप सोमपुरा यांनी सांभाळली असून पार्श्वसंगीत कश्यप सोमपुरा आणि मलिक वार्सी यांचे आहे.
अफलातुन चित्रपटाच्या संगीताचे हक्क सारेगामाकडे आहेत. नृत्यदिग्दर्शन रंजू वर्गीस, वेशभूषा मीनल डबराल गज्जर, कलादिग्दर्शन नितीन बोरकर यांचे आहे.
वितरणाची जबाबदारी ए.ए फिल्म्स ने सांभाळली आहे. मंगेश जगताप, सेजल पेंटर, शीला जगताप, अश्विन पद्मनाभन, सत्यनारायण मूरथी, डॉ. झारा खादर सहनिर्माते आहेत. ऑनलाईन निर्माते अवधूत डिस्ट्रीब्युटर आहे.
साहा अँड सन्स स्टुडिओज,आयडियाज द एंटरटेन्मेन्ट कंपनी निर्मित ‘अफलातून’ हा चित्रपट येत्या २१ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.