tejaswini pandit: आपल्या दर्जेदार अभिनयाने यशाची उंची गाठलेल्या अभिनेत्री तेजस्विनी पंडित (Tejaswini pandit) ने मराठी मनोरंजन विश्वात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. एखाद्या भूमिकेतला सोज्वळपणा असो किंवा 'रानबाजार' सारखा बोल्डनेस, तिने सर्वच भूमिका लिलल्या पेलल्या आहेत. ती सोशल मिडियावर बरीच सक्रिय असते. जी ज्या आपुलकीने चाहत्यांशी संवाद साधते, तेवढ्याच तीव्रतेने टीकेला उत्तरही देते. त्यामुळे तिच्या सोशल मीडिया अकाऊंट कडे सर्वांचं लक्ष लागून असतं. आज तिने एक अशी पोस्ट शेयर केली आहे, ज्यामुळे सर्वांचं लक्ष वेधलं आहे.
(Tejaswini Pandit shared post about birth anniversary of sindhutai sapkal )
आज तिच्या पोस्टचा विषय आहे, आपल्या सर्वांच्या लाडक्या माई. म्हणजेच अनाथांची माय सिंधुताई सपकाळ. गतवर्षी माईंचं निधन झालं. त्यामुळे आज त्या आपल्यात नाहीत. आज त्यांच्या वाढदिवासानिमित्त एक पोस्ट तेजस्विनीने शेयर केली आहे.
तेजस्विनी म्हणते, 'फार गाजावाजा नाही, कुठलेही अजेंडे नाही, गर्दी नाही, अत्यंत साधेपणानेएकाच व्यक्तिमत्त्वाला साजरा करण्यासाठी एकत्र आलो.... सिंधुताई सपकाळ!माई , आठवण यायला आम्ही तुम्हाला विसरलोच नाही...! उलट चित्रांमधून तुम्हाला पुन्हा अनुभवता आलं!'
पुढे ती म्हणते, 'मित्रांनो,माईंच्या वाढदिवसाचं औचित्य साधून त्यांच्या स्मरणार्थ आयोजित केलेलं आणि प्रणव सातभाई ने काढलेलं डिजिटल पोर्ट्रेट्सचं प्रदर्शन हे आता तुमच्यासाठी खुलं आहे, जरूर बघून या...!शेवटच्या फोटो मध्ये वेळ आणि लोकेशन सुद्धा आहे.' या पोस्ट सह तिने चित्र प्रदर्शनाचे फोटो आणि सर्व तपशीलही दिले आहेत.
अभिनेत्री तेजस्विनी पंडीतचं माईंशी खूप जवळचं नातं बनलं ते 'मी सिंधुताई सपकाळ' या सिनेमाच्या निमित्तानं.. तेजस्विनीने माईंची व्यक्तिरेखा साकारली होती. तेजस्विनीला जेव्हा सिंधुताईंनी सिनेमात पाहिलं होतं तेव्हा त्या खूप आनंदात होत्या तिचं काम पाहून. आज सिंधुताई सपकाळ हयात नसल्या तरी त्यांच्या कुटुंबाशी, त्यांच्या अनाथाश्रमाशी तेजस्विनीचे नाते अगदी घट्ट आहे. म्हणूनच तिची ही पोस्ट माईंच्या स्मृती जागवणारी ठरली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.