thalapathy vijay leo movie enter in 100 cr club SAKAL
मनोरंजन

Leo box office collection: दोनच दिवसात सेंच्युरी पार! बॉक्स ऑफीसवर लिओची यशस्वी घोडदौड

थलापती विजयच्या लिओ सिनेमा दोनच दिवसात शंभर कोटी क्लबमध्ये दाखल झालाय

Devendra Jadhav

Leo box office collection Day 2 News: थलापती विजयचा लिओ सिनेमा १९ ऑक्टोबरला जगभरात प्रदर्शित झाला. विजयच्या लिओ सिनेमाची अनेक महिन्यांपासुन उत्सुकता होती. अखेर लिओ सिनेमा प्रदर्शित झाला.

लिओ सिनेमाचं दुसऱ्या दिवसाचं बॉक्स ऑफीस कलेक्शन समोर आलंय. लिओ सिनेमासंबंधी संमिश्र प्रतिक्रिया असल्या तरीही सिनेमा छप्परफाड कमाई करताना दिसतोय.

(thalapathy vijay leo movie enter in 100 cr club)

लिओची दुसऱ्या दिवसाची कमाई

सेव्हन स्क्रीन स्टुडिओचा दावा आहे की, लिओ चित्रपटाने त्याच्या पहिल्या दिवशी (गुरुवारी) ₹148.5 कोटींचे जागतिक कलेक्शन केले, ज्यापैकी त्याने केवळ भारतात अंदाजे ₹64.80 कोटी कमावले.

याशिवाय सॅकनिल्कच्या अहवालानुसार, लिओने शुक्रवारी भारतात ₹36 कोटी कमावले. याशिवाय मुळ तामिळ सिनेमा पाहण्यासाठी 66 % थिएटर हाऊसफुल्ल होते. त्यामुळे थलापती विजयच्या लिओ सिनेमाने जागतिक स्तरावर १०० कोटींपेक्षा जास्त कमाई केलीय.

थलापती विजयचा लिओ सिनेमा तमिळ, तेलगू, मल्याळम, कन्नड आणि हिंदीसह अनेक भाषांमध्ये रिलीज झाला आहे.

हा चित्रपट लोकेश कनगराजच्या ‘लोकेश सिनेमॅटिक युनिव्हर्स’ या सिनेमॅटिक फ्रँचायझीचा एक भाग असल्याचे सांगितले जाते. याआधी कैथी, विक्रम हे युनिव्हर्सचे सिनेमे सुपरडूपरहिट झालेत.

लिओ सिनेमात थलपथी विजय व्यतिरिक्त संजय दत्त, त्रिशा कृष्णन, अर्जुन सर्जा, मन्सूर अली खान, प्रिया आनंद, मिस्किन आणि गौतम वासुदेव मेनन यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT