Vijay to take a break from acting to focus on politics and 2026 elections Esakal
मनोरंजन

Thalapathy Vijay: थलापतिचा राजकारणात होणार 'विजय' ! 2026 च्या विधानसभा निवडणुकीत करणार धमाका?

Vaishali Patil

Thalapathy Vijay political debut News: सध्या मनोरंजन विश्वात साउथ स्टारची काही वेगळीच हवा आहे. त्यात दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता थलपथी विजय याच्या चाहत्यांची संख्याही काही कमी नाही.

तो नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. आताच भारतातील सर्वात जास्त मानधन घेणाऱ्या कलाकारांच्या यादित त्याचा सामावेश झाला आहे. आता सध्या त्याच्या आगामी 'लिओ' चित्रपटामुळे चर्चेत आहे.

चित्रपटातील 'ना रेडी' गाण्यावरून बराच वाद झाला. चेन्नईतील एका सामाजिक कार्यकर्त्याने निर्मात्यांविरोधात पोलिसांत तक्रार केली होती.

दरम्यान आता गेल्या काही दिवसांपासून विजय हा राजकारणातुन ब्रेक घेणार असल्याची चर्चा रंगली होती. आता त्यातच मोठी अपडेट समोर आली आहे.

लिओ चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर विजय २-३ वर्षांसाठी ब्रेक घेणार असल्याचा दावा करण्यात येत आहे.

यामागचे कारण म्हणजे विजयला 2026 मध्ये तामिळनाडूच्या निवडणुकांवर लक्ष केंद्रित करायचे आहे. इतकच नाही तर तो त्याच्या चाहत्यांची संघटना तयार असल्याच बोललं जात आहे.

मिडिया रिपोर्टमध्ये दावा करण्यात येत आहे की, विजय 2 किंवा 3 वर्षांचा ब्रेक घेतल्यानंतर पुन्हा तामिळ सिनेमात एंट्री करणार आहे.

2024 च्या अखेरीस संपवणार आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीनंतर तो स्वतःचा पक्ष बनवू इच्छितो आणि त्यानंतर 2026 ची तामिळनाडू विधानसभा निवडणूक लढवू इच्छितो. असंही बोललं जात आहे.

ऑल इंडिया थलपथी विजय मक्कल इय्यकम ही संघटना विजयच्या चाहत्यांनी सुरु केली आहे. ज्याचा हिरो थलपती आहे.

याअंतर्गत अनेक समाज उपयोगी उपक्रम केले जातात. विविध उपक्रम राबवले जातात. तामिळनाडूतील सर्व जिल्ह्यात या संघटनेचे सदस्य आहेत.

2022 ला विजयने तामिळनाडूमधील शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही लढवल्या होत्या. दरम्यान आता 2026 मध्ये तो पुन्हा निवडणूकाला उभा राहून तामिळनाडूच्या सत्ताधारी स्टालिन सरकारला आव्हान देणार का अशा चर्चा सुरु आहेत.

दरम्यान अद्याप तरी अभिनेता विजय किंवा त्याच्या संस्थेने या बातमीला दुजोरी दिलेला नाही. मात्र

तथापि, याला अभिनेते किंवा संस्थेने दुजोरा दिलेला नाही. मात्र इंडिया टुडेने यासंबधित वृत्त दिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates : दक्षिण नागपूर मतदार संघातून भारतीय जनता पार्टीचे मोहन मते 15573 मतांनी विजयी

Harish Pimple Won Murtizapur Assembly Election 2024: भाजप उमेदवार हरीश पिंपळे तिसऱ्यांदा विजयी!

Chiplun Assembly Election 2024 Results : चिपळूण विधानसभा निवडणुकीत शेखर निकमांनी राखला गड; प्रशांत यादवांचा पराभव

Purandar Assembly Election 2024 Result Live: तिरंगी लढतीत विजय शिवतारेंनी पुरंदरचा 'गड' राखला, संजय जगताप यांना धोबीपछाड

Sajid Khan Pathan won Akola West Election 2024: भाजपचा बालेकिल्ला काँग्रसने जिंकला! अकोला पश्चिममध्ये साजिद खान पठाण करणार 'राज्य'

SCROLL FOR NEXT