Thanglaan Movie : दाक्षिणात्य चित्रपट विश्वातील प्रसिद्ध अभिनेता चियान विक्रमच्या (Chiyaan Vikram ) थांगलान (Thangalaan Latest news) या चित्रपटाची चाहत्यांना खूपच उत्सुकता आहे. गेल्या काही दिवसांपासून त्याच्याविषयीच्या अनेक चर्चांना उधाण आल्याचे दिसून आले आहे.
भारतात कोणेएकेकाळी सोन्याचा धूर निघायचा असे म्हटले जात होते. ब्रिटिशांनी जेव्हा भारतात पाय ठेवला तेव्हा त्यांना या सोन्याच्या विषयानं मोहात पाडले. त्यांनी अनेक ठिकाणी माईन्स सुरु केल्या. त्यात गरीब भारतीयांना कामाला ठेवून त्यांच्यावर अन्याय अत्याचार करण्यात आले. असं म्हटलं जातं की, इंग्रज जेव्हा भारतातून गेले त्यावेळी त्यांनी तब्बल ९०० टन सोनं आपल्यासोबत नेलं.
थांगलानमध्ये निर्मात्यांनी या साऱ्या गोष्टींचा वेध घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळेच की काय या चित्रपटाचे प्रेक्षकांना बऱ्याच वर्षांपासून वेध लागले आहेत. भारतातील गोल्ड माईन्समधील सत्य काय आहे अनेकांना माहिती नसल्याचे मेकर्सचे म्हणणे आहे. थांगलानमधून ते समोर आणण्याचा प्रयत्न ते करत आहेत.
काय आहे थांगलानची स्टोरी? (Thangalaan Story)
विक्रमच्या ज्या थांगलान नावाच्या चित्रपटाची जोरदार चर्चा होत आहे तो चित्रपट नेमका आहे तरी काय हे आपण जाणून घेऊयात. कोलार गोल्ड माईनमधील अनेक गोष्टींचा उलगडा या चित्रपटातून होणार असल्याचे सांगण्यात येते. त्या गोल्ड माईन्समध्ये ब्रिटिशांनी केलेल्या वसाहती. आपल्या फायद्यासाठी केलेले अत्याचार याविषयी थांगलानमध्ये भाष्य करण्यात आले आहे.
थांगलान टीझर... (Thangalaan Teaser)
गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये थांगलान (Thangalaan Viral Teaser) चा टीझर प्रदर्शित झाला होता. त्यातील ओपनिंग सीननं कमाल केली होती. विक्रमच्या लूक आणि अभिनयाचे प्रेक्षकांनी खूप सारे कौतुक केले होते. तेव्हापासून हा चित्रपट कधी प्रेक्षकांच्या भेटीला येतो याचे वेध चाहत्यांना लागले आहेत. विक्रमचा या चित्रपटातील लूक चाहत्यांसाठी वेगळं गिफ्ट ठरणार आहे.
कधी प्रदर्शित होणार?
बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित असा थांगलान चित्रपटाकडे प्रेक्षकांचे लक्ष आहे. तो कधी प्रदर्शित होणार याविषयी चाहत्यांना कमालीची उत्सुकता आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एप्रिल २०२४ मध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यापूर्वी विक्रमनं मणिरत्नम यांच्या पोनियन सेल्वन १ आणि पोनियन सेल्वन २ मध्ये काम केले होते. त्यानंतर तो आता थांगलान मध्ये दिसणार आहे.
जी व्ही प्रकाश यांनी या चित्रपटाचे संगीत दिग्दर्शन केले असून त्यात पार्वथी थिरुवोथु, मालविका मोहनन, पशुपति, मुथुकुमार, हरि कृष्णन, प्रीथी,अर्जुन प्रभाकरन, आणि हॉलीवूडचा अभिनेता डॅनियल गोल्ड ड्रॅगन यांच्या भूमिका आहेत. स्टुडिओ ग्रीनच्या वतीनं या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली असून तो पाच भाषांमध्ये प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.