आज मुंबईत Dadasaheb Phalke Film Foundation Awards 2023 चा आलिशान सोहळा रंगणार आहे. या पुरस्कार सोहळ्यासाठी बॉलिवूडचे सितारे आज मुंबईत अवतरणार आहेत.
Dadasaheb Phalke Film Foundation हे भारतीय चित्रपट संस्कृतीचा प्रचार आणि समर्थन करण्यासाठी चर्चासत्र आणि इतर सामाजिक उपक्रम आयोजित करण्यासाठी कार्यरत आहे. आज Dadasaheb Phalke Film Foundation Awards 2023 सर्वजण उत्सुक आहेत.
Dadasaheb Phalke Film Foundation Awards 2023 मुंबईतील मुकेश पटेल सभागृहात आज संध्याकाळी रंगणार आहे. हा कार्यक्रम सायंकाळी ६ वाजल्यापासून सुरू होणार आहे.
'दादासाहेब फाळके फिल्म फाउंडेशन' पुरस्कार सोहळ्यामध्ये बॉलिवूडचे बडे सेलिब्रिटी सहभागी होणार आहेत. Dadasaheb Phalke Film Foundation Awards हा मानाचा पुरस्कार म्हणून ओळखला जातो.
या मोठ्या कार्यक्रमात टीव्हीपासून ते बॉलिवूड स्टार्स सहभागी होणार आहेत. दादासाहेब फाळके फिल्म फाऊंडेशन पुरस्कार आज संध्याकाळी ६ वाजल्यापासून सुरू होणार आहे. या तारांकित संध्याकाळची सर्व व्यवस्था एमपी ऑडिटोरियम, जेव्हीपीडी स्कीम, विलेपार्ले पश्चिम, मुंबई येथे करण्यात आली आहे. या ठिकणी सिने तारकांची जत्रा भरणार आहे. या अवॉर्ड नाइटमध्ये टीव्हीपासून बॉलिवूडपर्यंतच्या सौंदर्यवतीही सहभागी होणार आहेत.
बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खान, ज्येष्ठ अभिनेत्री मनीषा कोईराला, कार्तिक आर्यन यांसारख्या अनेक दिग्गजांनी यापूर्वी झालेल्या दादासाहेब फाळके फिल्म फाऊंडेशन पुरस्कार सोहळ्यात भाग घेतला आहे.
अशा परिस्थितीत उद्याचा कार्यक्रमही ग्लॅमर आणि बड्या स्टार्सनी भरलेला असेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Dadasaheb Phalke Film Foundation Awards मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट, दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री हे चार पुरस्कार कोणाला मिळणार यावर सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत.
याशिवाय अनेक कॅटेगरीमध्ये स्टार्स आणि मनोरंजनाशी संबंधित व्यक्तींना पुरस्कार देण्यात येणार आहेत. पुरस्कार देण्याबरोबरच या कार्यक्रमात सौंदर्यवती आणि कलाकारही नृत्य करताना दिसणार आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.