ओडिशातील बालासोर जिल्ह्यातील बहनगा रेल्वे स्थानकाजवळ काल (शुक्रवारी 2 जून) संध्याकाळी 7 वाजण्याच्या सुमारास मोठा रेल्वे अपघात झाला. कोरोमंडल एक्सप्रेस आणि मालगाडी या दोन्ही गाड्या एकाच वेळी एकाच रुळावर आल्याने हा भीषण अपघात झाला आहे.
या अपघातात 233 जणांचा मृत्यू झाला असून 900 जण जखमी झाल्याची माहिती अधिकार्यांनी दिली आहे. यशवंतपूर-हावडा सुपरफास्टने कोरोमंडल एक्स्प्रेसच्या काही डब्यांच्या रुळावरून घसरलेल्या बोगींना धडक दिली आणि ती विरुद्ध रुळावर पडली. कालपासून सुरू असलेलं बचाव कार्य अजूनही सुरू आहे.
या भयंकर रेल्वे अपघातावर पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते सर्वच स्तरावरील लोकांनी शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटद्वारे शोक व्यक्त केला आहे.
पंतप्रधानांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, ओडिशातील रेल्वे अपघाताच्या घटनेने मी व्यथित झालो आहे. या दु:खाच्या प्रसंगी माझे संवेदना कुटुंबियांसोबत आहेत. जखमींना लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा.
या घटनेने मनोरंजन विश्वात देखील शोक व्यक्त करण्यात येत आहे. बॉलिवूडचा भाईजान सलमान खानने देखील यावेळी ट्विट करत शोक व्यक्त केला.
सलमान खानने लिहिले की, "दुर्घटनेबद्दल ऐकून खूप दुःख झाले, देव मृतांच्या आत्म्याला शांती देवो, या दुर्दैवी अपघातातून त्याचे रक्षण करो आणि कुटुंबीयांना आणि जखमींना या अपघातातुन बाहेर येण्याची शक्ती देवो."
तसेच साउथ स्टार ज्युनियर एनटीआरने देखील शोक व्यक्त करत ट्विट केले. त्यात तो म्हणाला, “दुःखद.. रेल्वे अपघातामुळे प्रभावित झालेल्या कुटुंबियांना आणि त्यांच्या प्रियजनांप्रती मनापासून संवेदना आहेत. या विनाशकारी घटनेमुळे प्रभावित झालेल्या प्रत्येक व्यक्तीसोबत माझे विचार आहेत. या कठीण काळात त्यांना शक्ती आणि आधार देवो.
तर दुसरीकडे चिरंजीवीने त्याच्या चाहत्यांना रक्तदान करण्याची विनंती केली आहे. गरज असेल तिथे आणि शक्य असेल तितकी मदत करण्याचं आवहन चिरंजीवीने चाहत्यांना केलं आहे.
ते लिहितात, “ओरिसामधील कोरोमंडल एक्स्प्रेसच्या दु:खद दुर्घटनेने आणि मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाल्याने अत्यंत धक्का बसला! माझे हृदय शोकाकुल कुटुंबियांनासाठी व्यथित आहे. मला समजते की जीव वाचवण्यासाठी रक्ताची मोठ्या प्रमाणात मागणी आहे. माझ्या सर्व चाहत्यांना आणि जवळच्या भागातील व्यक्तींना जखमींचे जीवन वाचवण्यासाठी रक्त दान करण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आवाहन करतो.
तर प्रिया आनंदने याघटनेला “विनाशकारी” म्हटले आणि पुढे म्हटले, “अस्वीकार्य निष्काळजीपणा...असं म्हटलं आहे.
ओडिशा रेल्वे अपघात लाजिरवाणा असल्याचे वर्णन करताना प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी ट्विट केले की, “दुःखद आणि अत्यंत लाजिरवाणी. या वयात आणि काळात 3 गाड्या एकत्र कशा असू शकतात? जबाबदार कोण? सर्व कुटुंबासाठी प्रार्थना.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.