Protest Against The Creator Sarjanhar movie  Esakal
मनोरंजन

The Kerala Story नंतर आता पुन्हा होणार लव-जिहाद वरनं राडा..'या' नव्या सिनेमानं फुंकलं वादाचं रणशिंग

'द क्रिएटर सर्जनहार' सिनेमाविरोधात हिंदू संघटना अहमदाबादमध्ये आक्रमक झाल्याचं दिसून येत आहे.

प्रणाली मोरे

Protest Against The Creator Sarjanhar movie : नवा सिनेमा 'द क्रिएटर सर्जनहार' विषयी सध्या मोठा वाद सुरु झाला आहे. हा सिनेमा अहमदाबादच्या ज्या मल्टिप्लेक्समध्ये रिलीज होणार होता तिथे बजरंग दलानं विरोध प्रदर्शन केल्याचं समोर आलं आहे. या सिनेमाविषयी काही दिवसांपूर्वी वादाची ठिणगी पडली होती.

आधी द केरळ स्टोरी सिनेमाविषयी जोरदार विरोध प्रदर्शन पहायला मिळालं. आता या नव्या 'द क्रिएटर सर्जनहार' सिनेमाविरोधात हिंदू संघटना आक्रमक झाल्याचं दिसून येत आहे.(The Creator Sarjanhar movie bollywood protest bajrang dal ahmedabad Multiplex love jihad the kerala story)

अहमदाबादच्या मल्टिप्लेक्स बाहेर बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन एका सुरात जय श्रीराम अशा घोषणा दिल्या. यादरम्यान कार्यकर्त्यांनी असं देखील सांगितलं की ते हिंदू धर्माच्या बचावासाठी कायम सज्ज आहेत.

सोशल मीडियावर एक व्हिडीओ देखील व्हायरल झाला आहे ज्यात सर्व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी भगव्या रंगाचा शेला ओढला आहे. आणि जोरजोरात जय श्री राम अशी घोषणाबाजी करत आहेत आणि सिनेमावर बंदी आणण्याची मागणी करत आहेत.

या सिनेमात सीआयडी मध्ये दया ही व्यक्तिरेखा साकारणारा अभिनेता दयानंद शेट्टी मुख्य भूमिकेत आहे. याव्यतिरिक्त या सिनेमात शाजी चौधरी,रोहित चौधरी,रजा मुराद,नीलू कोहली,अनंत महादेवन आणि आर्या बब्बर सारखे कलाकार देखील आहेत. हा सिनेमा देशभरात अनेक ठिकाणी २६ मे रोजी रिलीज होईल. या सिनेमाचं दिग्दर्शन परवीन हिंगोनियानं केलं आहे तर याची निर्मिती राजेश कराटे गुरुजीनी केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून द केरळ स्टोरी वरनं वाद सुरुच आहे आणि त्या सिनेमाला एक प्रोपगेंडा सिनेमा म्हटलं आहे. आता 'द क्रिएटर सर्जनहार' या सिनेमाविषयी देखील अशीच परिस्थिती पहायला मिळते आहे.

सिनेमाविषयी निर्माते म्हणाले,''मला कशाचीच भिती नाही,माझं माझ्या धर्मावर प्रेम आहे आणि माझं या वादाशी काहीच घेणं देणं नाही. मला वाटतं की धर्माच्या नावावर कोणत्याच प्रकारचा वाद छेडणं चुकीचं आहे. धर्मापेक्षा माणुसकीला जतन करा. तुम्हाला हे असे वाद करुन आपल्या कुटुंबापासून दूर जायचं आहे का?''

'द क्रिएटर सर्जनहार' सिनेमाच्या ट्रेलर विषयी बोलायचं झालं तर यामध्ये वेगवेगळ्या धर्माच्या तरुणांना प्रेम करताना दाखवलं आहे. ज्या व्यक्तीभोवती सिनेमाची कथा फिरते तो धर्म आणि जात यांना महत्त्व न देता प्रत्येक माणसाला माणुसकीच्या नजरेतून पाहत असतो. त्याला वाटत असतं लोकांनी धर्माला विसरुन फक्त प्रेमाला महत्त्व द्यावं. पण हा सिनेमा हिंदू संघटनांच्या निशाण्यावर आहे. आता पहायचं की सिनेमा रिलीज नंतर प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT