‘The Elephant Whisperers’ fame Bomman And Bellie Allege Exploitation against Makers Of Oscar-Winning Documentary  SAKAL
मनोरंजन

"आमचे पैसे हडपले.." ऑस्कर विजेत्या The Elephant Whispers मधील बोमन - बेली या आदिवासी जोडप्याचे दिग्दर्शकावर गंभीर आरोप

'द एलिफंट व्हिस्पर्स' फेम बोमन आणि बेली यांचे निर्मात्यांवर गंभीर आरोप.

Devendra Jadhav

ऑस्कर विजेता माहितीपट 'द एलिफंट व्हिस्पर्स' पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या माहितीपटात बोमन आणि बेली या आदिवासी जोडप्याची संपूर्ण कहाणी दाखवली. परंतु बोमन आणि बेली यांनी निर्मात्यांवर गंभीर आरोप केले आहेत.

आजपर्यंत पैसे मिळाले नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यांनी दिग्दर्शक कार्तिकी गोन्साल्विस आणि सिख्या एंटरटेनमेंटच्या विरोधात मुलाखत दिली असून 2 कोटी रुपयांची मागणी केली आहे.

(‘The Elephant Whisperers’ fame Bomman And Bellie Allege Exploitation By Makers)

मदत देण्याचे आश्वासन पण...

PTI या वृत्तसंस्थेने केलेल्या कायदेशीर नोटीसच्यामध्ये बोमन आणि बेली यांनी दावा केला आहे की, मेकर्सने त्यांना घर देण्याचे वचन दिले होते. याशिवाय गाडी व पुरेशी आर्थिक मदत देण्याचे आश्वासन दिले.

नेमकी रक्कम नमूद केली नसली तरी निर्मात्यांनी पैसे देण्याचे आश्वासन सांगितले होते. डॉक्युमेंट्रीमधुन जे काही फायदे होतील, त्यातील काही भाग देणार असल्याचं त्यांनी सांगितलं होतं.

बोमन आणि बेलीला कोणतीही मदत मिळालं नाही

कायदेशीर नोटीसमध्ये असेही म्हटले आहे की, या जोडप्याला राजकारणी आणि अभिनेत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळाली. याशिवाय दुसरीकडे तामिळनाडूचे मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांकडून जी काही आर्थिक मदत मिळाली ती निर्मात्यांनी स्वतःकडे ठेवली.

बोमन आणि बेलीलाही काही मदत मिळाली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, तामिळनाडू सरकारने या जोडप्याला एक लाख रुपये आणि फिल्ममेकर कार्तिकी गोन्सालव्हीसला एक कोटी रुपये देण्याची घोषणा केली होती.

बोमन आणि बेलीचा वकील म्हणाला...

यानंतर PTI ने बोमन आणि बेली यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी याप्रकरणी अधिक बोलण्यास त्यांच्या वकीलाने मनाई करण्यात आल्याचे सांगितले.

चेन्नईस्थित सामाजिक कार्यकर्ते प्रवीण राज आणि वकील म्हणालेकी, ते या जोडप्याला अनेक दशकांपासून ओळखत आहेत. जेव्हा त्यांनी त्यांच्याशी संपर्क साधला तेव्हा ते एका लॉ फर्मद्वारे त्यांच्या संपर्कात आले होते.

बोमन आणि बेलीला दिग्दर्शकाने दिले उत्तर

प्रवीण म्हणाला, “बोमन आणि बेली दोघेही गोन्साल्विसमुळे निराश झाले आहेत. त्यांना पैसे देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. यासोबतच बेलीच्या नातवाच्या शिक्षणाची जबाबदारीही त्यांनी घेतल्याची चर्चा होती.

याशिवाय चित्रपटाच्या नफ्यातील निम्मा भाग देण्यास मेकर्सनी नकार दिला. मेकर्सनी या दोघांना चित्रपटात जे सांगितले होते ते त्यांनी केले. पण आता गोन्साल्विस बोमनचा फोनही उचलत नाहीत.

त्याच वेळी, हे प्रकरण हाताळणारे वकील मोहम्मद मन्सूर म्हणाले की, 4 दिवसांपूर्वी त्यांना सिख्या एंटरटेनमेंटकडून या नोटीशीला उत्तर मिळाले आहे. दिग्दर्शक गोन्सालव्हिस यांनी नोटीसमध्ये लिहीले, या जोडप्याला आधीच पैसे दिले असल्याने ती जास्त पैसे देणार नाही.

आता ऑस्कर विजेत्या 'द एलिफंट व्हिस्पर्स' फेम आदिवासी जोडपं बोमन आणि बेली यांना न्याय मिळणार का, हे पाहणं चर्चेचा विषय आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chetan Tupe won Hadapsar Assembly Election 2024: हडपसरमधील परंपरा मोडत चेतन तुपे यांचा विजय; प्रशांत जगताप यांचा पराभव

UP By Election: उत्तरप्रदेशात सुद्धा भगवे यश! पोटनिवडणुकीत योगींनी लोकसभेचे अपयश धुवून काढले, जाणून घ्या करणे

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: वांद्रे पूर्वमधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वरुण सरदेसाई विजयी

Nanded Lok Sabha By Election Result 2024 : पोटनिवडणुकीतही काँग्रेसला मोठा झटका; गमावलेली नांदेडची जागा भाजपनं जिंकली

BJP Pravin Datke Won Nagpur Central Election : नागपूर मध्यचा गड भाजपने राखला, भाजपचे प्रवीण दटके 11516 मतांनी विजयी

SCROLL FOR NEXT