the family man file image
मनोरंजन

The Family Man: आर्थिक संकटांमुळे अभिनेत्याला सोडावे लागले मुंबईचे घर

वेब सीरिजमध्ये अभिनेत्याने साकारली महत्त्वपूर्ण भूमिका

प्रियांका कुलकर्णी

कोरोना महामागी आणि लॉकडाउनचा फटका अनेक क्षेत्रांना बसला. मनोरंजन क्षेत्रातील अनेक कलाकारांवर उपासमारीची वेळ आली, हाती असलेलं काम गेलं. बहुचर्चित वेब सीरिज 'द फॅमिली मॅन २'मध्ये (the family man) साजिदची भूमिका साकारणारा अभिनेता शाहब अलीने (shahab ali) नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये त्याच्यावर आलेल्या आर्थिक संकटाबाबत खुलासा केला. शाहबने सांगितले, 'फॅमिली मॅन वेब सीरिज प्रदर्शित होण्याआधी मी खूप अडचणीत होतो. माझे सर्व काम थांबले होते. मी माझे मुंबईमधील घर सोडून दिल्लीमधील घराकडे परत आलो. मी अजूनही दिल्लीमध्ये आहे. या वेब सीरिजचा दुसरा सिझन आला आहे. माझी आशा आहे की आता तरी सर्व गोष्टी बदलतील.' (the family man actor says financial crisis forced to leave mumbai flat)

पुढे शाहब म्हणाला, 'मी मध्यमवर्गीय कुटुंबातून आलो आहे. मला नेहमी आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. अजूनही मी या अडचणींचा सामना करत आहे. सर्व काही माझ्या हाती येणाऱ्या कामावर अवलंबून आहे. मला अजून काम करायचे आहे. जर मी अजून काम केले तर परिस्थिती सुधारेल अशी मला आशा आहे. संगीत कार्यक्रमांनी मला थोडी स्थिरता दिली. मी माझ्या कुटुंबाला आधार देण्यास आणि स्वप्न पूर्ण करण्यास सक्षम होतो. मला मुंबईला परत जायचे आहे. पण मला तिथे राहणे परवडणार नाही. दिल्लीवरून मुंबईला येणे हा खूप मोठा निर्णय होता. फॅमिली मॅन वेब सीरिजमुळे मला पुन्हा नवी आशा मिळाली.'

'फॅमिली मॅन'मधील अतिरेकी साजिदच्या भूमिकेबद्दल बोलताना शाहब अली म्हणाला, ‘माझ्यासाठी साजिद हे अँटी-हिरो आणि व्हिलन यांच्यामध्ये फिरणारे पात्र आहे. भूमिका उत्तमरित्या साकारण्यासाठी मी काही कार्यशाळा केल्या आणि स्वत:चा अनुभवही भूमिकेत ओतला. लूकसाठी 6-7 किलो वजन वाढवलं. साजिद फारसा अभिव्यक्त होणारा नसल्यानं मी निर्विकार राहण्यावर काम केलं. दिग्दर्शकांच्या सूचनांनुसार बॉडी लँग्वेजवर काम केलं.’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump 2.0: डोनाल्ड ट्रम्प पुन्हा आले! राष्ट्राध्यक्ष पदाच्या दुसऱ्या टर्मचा भारतावर काय होऊ शकेल परिणाम?

लग्नाआधी होणाऱ्या नवऱ्याबरोबर लिव्ह इन मध्ये राहत होती हृता दुर्गुळे ; आई होती नाराज पण सासूबाईंची होती अशी प्रतिक्रिया

'सासूसाठी भांडण अन् सासूच आली वाट्याला..'; 'मविआ'चा लाटकरांना पाठिंबा, विरोध करणाऱ्यांवरच आली प्रचार करण्याची वेळ

Mukesh Ambani Diet: नीता अंबानींनी शेअर केला मुकेश अंबानींचा डाएट प्लॅन, निरोगी राहण्यासाठी तुम्हीही करू शकता फॉलो

Stock Market: ट्रम्प यांचा दणदणीत विजय आणि भारतीय शेअर बाजाराने दिली सलामी; कोणते शेअर्स वाढले?

SCROLL FOR NEXT