Kangana Ranaut ani
मनोरंजन

"१९४७ मध्ये मिळालेलं स्वातंत्र्य म्हणजे भीक"; कंगनाच्या विधानावरून नवा वाद

"खरं स्वातंत्र्य तर २०१४ मध्ये मिळालं"

स्वाती वेमूल

पद्मश्री पुरस्कार प्राप्त अभिनेत्री कंगना रणौत Kangana Ranaut तिच्या आणखी एका वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे. १९४७ मध्ये मिळालेलं स्वातंत्र्य ही भीक होती, खरं स्वातंत्र्य २०१४ मध्ये मिळालं, असं विधान कंगनाने केलं. 'टाइम्स नाऊ'च्या समिट २०२१ मध्ये तिने केलेल्या या विधानावरून सोशल मीडियावर टिकाटिप्पणी होत आहे. "सावरकर, राणी लक्ष्मीबाई, नेता सुभाषचंद्र बोस यांच्याविषयी बोलायचं झालं तर त्यांना हे माहित होतं की रक्तपात झाला तरी हिंदुस्तानी हा हिंदुस्तानीवर वार करणार नाही. त्यांनी स्वातंत्र्याची किंमत मोजली हे खरं. पण ते स्वातंत्र्य नव्हतं, भीख होती. खरं स्वातंत्र्य तर २०१४ मध्ये मिळालं," असं कंगना म्हणाली.

कंगनाच्या उत्तरावर निवेदिका नाविका कुमार म्हणाल्या, "म्हणूनच सगळे तुला म्हणतात की तू भगवा आहेस." त्यावर कंगना म्हणते, "आता या विधानानंतर माझ्यावर आणखी १० केसेस होणार आहेत." "आता तू दिल्लीतच आहेस", असं नाविका यांनी म्हटल्यावर कंगनाने प्रत्युत्तर देत म्हटलं, "जायचं तर घरीच आहे ना." कंगनाच्या या विधानावर उपस्थितांपैकी काहींनी टाळ्यांचा वर्षाव केला. मात्र तिच्यावर सोशल मीडियावर टीकासुद्धा होऊ लागली आहे.

"तिच्या विधानावर टाळ्या वाजवणारे मूर्ख कोण आहेत, हे मला जाणून घ्यायचंय", असं ट्विट अभिनेत्री स्वरा भास्करने केलं. तर काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत म्हणाल्या, 'मानसिकदृष्ट्या स्थिर नसलेला विक्षिप्त व्यक्तीच आपल्याला मिळालेल्या स्वातंत्र्याला भीक म्हणू शकतो. या स्वातंत्र्यासाठी लाखो लोकांनी आपलं बलिदान दिलं. असो, अशा लोकांकडून अपेक्षा तरी काय ठेवायच्या? नाविकाजी यांनी स्वातंत्र्यासाठी वापरलेल्या अशा वक्तव्यावर आक्षेप का नाही घेतला? तुमच्याकडूनही अपेक्षा करणं चुकीचं आहे का?'

'म्हणूनच म्हटलं होतं, पैसाप्रसिद्धी मिळाली तर सोनू सूद बना, कंगना नाही', असं ट्विट माजी आयपीएस अधिकारी सूर्यप्रताप सिंह यांनी केलं. तर "अशा लोकांना पद्मश्री देणाऱ्या मोदींजींनी उत्तर द्यावं, की आपण अनेकांच्या बलिदानानंतर मिळालेल्या स्वातंत्र्याचं ७५वं वर्ष साजरा करतोय, की तुमच्या भक्तांनुसार भीक म्हणून मिळालेल्या स्वातंत्र्याचं", असा सवाल काँग्रेस नेते श्रीनिवास यांनी केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Latest Marathi News Updates live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंबाबाईचे दर्शन घेऊन सभेला करणार सुरुवात

SCROLL FOR NEXT