The Great Indian Family and Sukhee Box Office Collection Day 2: 'जरा हटके जरा बचके' या धमाकेदार चित्रपटानंतर विकी कौशल पुन्हा एक कॉमेडी ड्रामा चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आहे.
या चित्रपटाचं नाव म्हणजे 'द ग्रेट इंडियन फॅमिली'. हा सिनेमा 22 सप्टेंबर रोजी थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. विकी सोबतच चित्रपटाच्या निर्मात्यांनाही या चित्रपटापासून खुप अपेक्षा होत्या मात्र शाहरुखच्या जवानपुढे या चित्रपटाने काही खास कमाल केली आहे.
मानुषी छिल्लर आणि विकी कौशलच्या मुख्य भुमिका असलेला 'द ग्रेट इंडियन फॅमिली'चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाल्याचं दिसतयं
'द ग्रेट इंडियन फॅमिली' रिलीज होऊन अवघे दोनच दिवस झाले असले तरी या चित्रपटाने काही कमाल केलेली नाही. Sacknilk च्या रिपोर्टनुसार, चित्रपटाने पहिल्या दिवशी फक्त1.4 कोटींची कमाई केली होती. तर दुसऱ्या दिवशीही चित्रपटाने 1.80 कोटींची कमाई केली. या दोन दिवसाच्या कमाईचे आकडे पाहता या चित्रपटाने फक्त 3.20 कोटी रुपये कमावले आहे.
द ग्रेट इंडियन फॅमिलीचे दिग्दर्शन विजय कृष्ण आचार्य यांनी केले आहे. या चित्रपटात विकी कौशलसोबत मानुषी छिल्लर, कुमुद मिश्रा, मनोज पाहवा आणि यशपाल शर्मा महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत.
तर दुसरीकडे शिल्पा शेट्टीचा 'सुखी' चित्रपट देखील 22 सप्टेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. मात्र विकीच्या चित्रपटासारखाच हा सिनेमा देखील काही खास कमाल करु शकलेला नाही.
'सुखी' चित्रपटाने पहिल्या दिवशी 0.3 कोटी अन् दुसऱ्या दिवशीही केवळ 0.4 कोटींची कमाई केली आहे. अशा प्रकारे चित्रपटाने एकूण 0.7 कोटींची कमाई केली आहे.
तर या दोन्ही चित्रपटांना अजूनही टक्कर देत आहे तो शाहरुख खानचा 'जवान' सिनेमा. Sacknilk नुसार, 'जवान' ने रिलीजच्या 17 व्या दिवशी 12 कोटी रुपयांची कमाई केली आहे. यासह 'जवान'ची एकूण कमाई आता 545.58 कोटींवर पोहोचली आहे. त्यामुळे अजूनही जवानची बॉक्स ऑफिसवर हवा आहे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.