The Kashmir Files: विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित काश्मिर फाईल्सनं देशभरातील अनेक जाणकार, अभ्यासकांचे लक्ष वेधून घेतले आहे. प्रेक्षकांचा या चित्रपटाला (Vivek Agnihotry) मोठा प्रतिसादही मिळाला आहे. असे असताना त्यावरुन सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वादाला सुरुवात झाली आहे. काही राज्यांनी या (entertainment news) चित्रपटाला टॅक्स फ्री केलं आहे. आसामच्या मुख्यमंत्र्यांनी तर कर्मचाऱ्यांना हा चित्रपट पाहण्यासाठी अर्धा दिवस सुट्टी जाहिर केली होती. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी देखील काश्मीर फाईल्सचं कौतूक केलं होतं. आणि यापुढील काळात मिशन गंगावरही चित्रपट तयार करण्यात यावा अशी अपेक्षा एका कार्यक्रमातून व्यक्त केली आहे. आता एका आयएएस (IAS Officers)अधिकाऱ्याच्या प्रतिक्रियेनं काश्मिर फाईल्सकडं लक्ष वेधलं गेलं आहे.
1990 मध्ये काश्मिरच्या खोऱ्यात काश्मिरी पंडितांवर जे अन्याय अत्याचार झाले त्यावर विवेक अग्निहोत्री यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. अनेकांनी काश्मिर फाईल्सवर टीका केली आहे. एकांगी चित्रण आणि बाजु मांडली गेल्याच्या प्रतिक्रियाही काहींनी व्यक्त केल्या आहेत. यासगळ्यात मध्यप्रदेशातील एका वरिष्ठ पदावर कार्यरत असणाऱ्या सनदी अधिकारी नियाज खान यांनी सोशल मीडियावरुन एक पोस्ट शेयर केली आहे. त्यामध्ये आपण मुस्लिमांच्या ज्या हत्या झाल्या त्यावर काश्मिर फाईल्ससारखा चित्रपट तयार करणार असल्याचे सांगत वादात उडी घेतली आहे. एवढेच नाही तर या चित्रपटाची कथा स्वतच लिहिण्याची तयारीही दर्शवली आहे. काश्मिर फाईल्सच्या निर्मात्यांनी मुस्लिमांच्या हत्येवर तयार करावा अशी सुचना केली आहे.
नियाज खान म्हणाले की, काश्मिरी पंडितांना सन्मान मिळाला पाहिजे. त्यांनाही काश्मिरमध्ये राहण्याचा अधिकार आहे. देशातील मुस्लिमांना देखील योग्य तो न्या मिळाला पाहिजे. ते म्हणजे किडे मुंग्या नाहीत. त्यामुळे या देशात प्रत्येकाला सन्मानानं राहण्याचा अधिकार आहे. तो देखील चालता बोलता माणूस आहे. आणि या देशाचा नागरिक आहे. याचा विचार केला जावा. अशा प्रकारची प्रतिक्रिया त्या अधिकाऱ्यानं सोशल मीडीयावर दिली आहे. यापूर्वी नियाज खान यांनी काश्मिर फाईल्सवर एक ट्विट केले होते. त्यात त्यांनी जर काश्मिर फाईल्सच्या निर्मात्यांनी मुस्लिमांवर चित्रपट तयार केला तर आपण त्या चित्रपटासाठी कथा लिहून देऊ. असे म्हटले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.