'द काश्मिर फाईल्स'(The Kashmiri Files) सिनेमा भारतभरात चर्चेचा विषय ठरीत आहे. कुणी सिनेमाच्या समर्थनार्थ भाष्य करताना दिसत आहे,तर कुणी सिनेमात दाखवलंय ते सत्य नाही हे सांगत अगदी विरोधाचं टोक गाठताना दिसत आहे. खरंतर 'द काश्मिर फाईल्स' सिनेमा प्रदर्शना आधीपासूनच वादात अडकला होता. सिनेमाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी १९९० सालात काश्मिरमध्ये काश्मिरी पंडितांसोबत घडलेला नरसंहार आणि पलायनवादाचं सत्य मांडण्याचा प्रयत्न केल्यानं सोशल मीडियावर धमकीचा देखील सामना केला होता. त्यानंतर सिनेमात स्टार कलाकार नाहीत म्हणून कपिल शर्मा शो मध्ये प्रमोशनसाठी बोलावलं गेलं नाही असा आरोपही विवेक अग्निहोत्री यांनी केला होता. त्यानंतर कपिलला अनेकांनी ट्रोल केलं होतं. तो वाद मिटत नाही तोवर राजकीय गटातून सिनेमाच्या समर्थनार्थ आणि विरोधात असे दोन आवाज उठवले गेले. पण थेट पंतप्रधाना नरेंद्र मोदींचाच वरदहस्त सिनेमाला लाभल्यानं तसा फारसा काही फरक द काश्मिर फाईल्सला पडला नाही.
'द काश्मिर फाईल्स' सिनेमा पाहून सिनेमागृहातनं बाहेर पडणारा प्रत्येक प्रेक्षक रडताना दिसत आहे. सिनेमागृहात कुठे घोषणाबाजी होताना देखील दिसते आहे. हे चित्र जर भारतभरात आहे,तर जिथे प्रत्यक्ष लोकांवर अन्याय झालाय,होतोय त्या काश्मिरमध्ये नेमकं काय लोकांना वाटतंय ते कळणंही महत्त्वाचं नाही का. काश्मिरच्याच एका म्युझिकल बॅंडमध्ये काम करणाऱ्या सूरज भट(Suraj Bhat) या रॅपरनं १९९० सालच्या त्या सत्य घटनेला,अन्यायाला आपल्या गाण्यातून वाचा फोडली आहे.
त्यानं हे गाणं आपल्या आजोबांना समर्पित करत म्हटलं आहे,''काश्मिरमध्ये आपल्या भूमीत परत जाण्याची इच्छा मनात बाळगून निधन पावलेल्या माझ्या आजोबांना ही श्रद्धांजली आहे''. त्याचं हे गाणं सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालं आहे. अनुपम खेर यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर हे गाणं शेअर करीत काश्मिरमधून उठलेल्या या आवाजाचं कौतूक केलं आहे. सूरज भट या ऱॅपरच्या गाण्याचे बोल आहेत,'मैं हूँ कश्मीरी पंडित!'.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.