Sharad Pawar and Vivek Agnihotri, Vivek Agnihotri on Sharad Pawar esakal
मनोरंजन

'काश्मीर फाईल्सला नावं ठेवणारे शरद पवार सर्वाधिक भ्रष्ट' - विवेक अग्निहोत्री

विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित द काश्मीर फाईल्सनं गेल्या काही दिवसांपासून बॉ़लीवूडमध्ये प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

सकाळ ऑनलाईन टीम

The Kashmir Files: विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित द काश्मीर फाईल्सनं गेल्या काही दिवसांपासून बॉ़लीवूडमध्ये प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. सोशल (Director Vivek Agnihotry) मीडियावर देखील या चित्रपटाची मोठ्या प्रमाणात चर्चा असल्याचे दिसून आले आहे. काश्मीरी पंडिताना 90 च्या दशकात सामोऱ्या जाव्या (Bollywood News) लागलेल्या अन्याय, अत्याचार यांचे चित्रण या चित्रपटामध्ये करण्यात आले असून त्यावरुन मोठा वादही झाल्याचे दिसून आले आहे. देशातील (Sharad pawar) अनेक राज्यांमध्ये त्यावरुन अनेक हिंसक गोष्टी घडल्या. प्रेक्षकांना हा चित्रपट पाहण्यासाठी काही पक्षांनी आवाहन केल्याच्या बातम्या व्हायरल झाल्या होत्या. (Vivek Agnihotri on Sharad Pawar)

दरम्यानच्या काळात काश्मीर फाईल्सला (The kashmir Files) राजकीय रंग चढल्याचे दिसून आले. वेगवेगळ्या पक्षातील नेत्यांनी त्यावर भाष्य केले होते. देशाचे उपराष्ट्रपती वैंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील काश्मीर फाईल्सचं कौतुक केलं होतं. राज्याच्या विधानसभेत देखील त्यावरुन चर्चा झाली होती. त्याचे कारण म्हणजे काही राज्यांमध्ये हा चित्रपट टॅक्स फ्री करण्यात आला होता. महाराष्ट्रात देखील तो टॅक्स फ्री करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली होती. मात्र ती काही मान्य झाली नाही. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काश्मीर फाईल्सवर प्रतिक्रिया दिली होती. हा चित्रपट धार्मीक भावना भङकावणारा आहे. असे त्यांनी म्हटले होते. त्यावर दिग्दर्शक अग्निहोत्री यांनी पवार यांच्यावर टीका केली आहे.

राज्यातील कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पवार यांनी काश्मीर फाईल्सवर टीका केली होती. त्यावर अग्निहोत्री यांनी पवार यांना उत्तर दिले आहे. ते म्हणाले, पुन्हा एकदा पवार खोटं बोलले आहेत. ते त्यांनी दुहेरी भूमिका घेतली आहे. भारतीय राजकारणातील सर्वात भ्रष्ट नेता म्हणून त्यांचे नाव घ्यावे लागेल. आमची जेव्हा स्वतंत्रपणे भेट झाली होती तेव्हा त्यांनी मला काश्मीरी पंडितांविषयी वेगवेगळ्या गोष्टी केल्या होत्या. आणि ते आता सार्वजनिकरीत्या या चित्रपटाला नावं ठेवत आहेत. त्यामुळे मला वाटतं कर्म हे कधीही कुणाला माफ करत नाही. त्याचा सामना प्रत्येकाला करावाच लागतो. अशाप्रकारची टिप्पणी अग्निहोत्री यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात विजयी मिरवणूक काढण्यास सक्त मनाई; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अमित ठाकरेच आमदार होणार; मनसेला विश्वास

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

Versova Assembly Constituency Result: भारती लव्हेकर विरुद्ध हारून खान

SCROLL FOR NEXT