The Kerala Story Box Office Collection: बॉलीवूडच्या चित्रपटांबद्दल बोलायचं झालं तर अनेकदा असं चित्र दिसून आलं आहे की, एखाद्या चित्रपट प्रदर्शित होण्यापुर्वी जितका जास्त वाद होईल तो चित्रपट तितकाच हिट ठरतो. यात काश्मीर फाईल्स असो किंवा शाहरुख खान सारख्या मोठ्या कलाकाराचा पठाण.
शाहरुख खानच्या चित्रपटाबाबत सोशल मीडिया वापरकर्त्यांनी बॉयकॉट पठाण हा हॅशटॅगही ट्रेंड केला होता.त्यानंतर पठाण ने इतिहास रचला. अशा स्थितीत 'द केरळ स्टोरी' बाबतही असाच वाद झाला आणि आता याचा फायदा चित्रपटाला होतोय का हे तर बॉक्स ऑफिसच्या कलेक्शनवरुन दिसत आहे.
अदा शर्मा स्टारर आणि विपुल शाह निर्मित आणि सुदिप्तो सेनद्वारा दिग्दर्शित 'द केरला स्टोरी' या चित्रपटाची सर्वत्र चर्चा सुरु आहे. 5 मे ला हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. केवळ मनोरजंन विश्वच नाही तर राजकिय विश्वातही बरिच चर्चा सुरु झाली.
सध्या या चित्रपटाबाबत दोन गट सोशल मिडियावर दिसत आहे. एक गट या चित्रपटाला केवळल प्रोपगंडा म्हणत आहे. तर दुसरा गट या चित्रपटाला चांगला प्रतिसाद देत आहे.
'द केरळ स्टोरी' हा चित्रपट सर्व वादानंतर 5 मे रोजी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटावरून अनेक दिवसांपासून वाद सुरू होता. अनेक राजकीय पक्षांनीही या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी देखील केली होती.
मात्र, या सगळ्यांशिवाय हा चित्रपट प्रदर्शित होताच प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर 8 कोटींची कमाई केली होती तर आता या चित्रपटाच्या दुसऱ्या दिवशीही या चित्रपटाकडून बऱ्याच अपेक्षा असतांनाच आता कमाईचे आकडे समोर आले आहेत.
दरम्यान, चित्रपटाच्या दुसऱ्या दिवसाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आले आहे. अवघ्या 40 कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाची कमाई चांगली मानली जात आहे.
जिथे चित्रपटाने रिलीजच्या पहिल्याच दिवशी 8 कोटींचा व्यवसाय केला. तर दुसऱ्या दिवशीही कमाईच्या आकडेवारीत कमालीची वाढ झाली आहे. सकनिल्कच्या सुरुवातीच्या ट्रेडनुसार, 'द केरळ स्टोरी' ने रिलीजच्या दुस-या दिवशी म्हणजेच शनिवारी 12.50 कोटींची कमाई केली आहे.
त्याचबरोबर रविवारच्या कलेक्शनमध्येही या बरिच वाढ होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. त्याचबरोबर सरकारने अनेक ठिकाणी 'द केरळ स्टोरी' चित्रपट करमुक्त घोषित केल्याने प्रेक्षक या चित्रपटाला प्रतिसाद देतील असं दिसतयं.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.