The Kerala Story Movie Review Viral Sudipto Sen : निर्माते विपुल अमृतलाल शहा व दिग्दर्शक सुदिप्तो सेन यांच्या 'द केरळ स्टोरी' या चित्रपटावरून अनेक वादविवाद निर्माण झाले होते. हा चित्रपट प्रदर्शित होऊ नये याकरिता सर्वोच्च न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आली होती. मात्र न्यायालयाने याबाबतीत कोणताही हस्तक्षेप करण्यास नकार दिल्यामुळे आता हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. केरळमधील तरुण मुलींच्या कथित धर्मांतराबद्दल, कट्टर धार्मिकतेबद्दल तसेच लव्ह जिहादबद्दल भाष्य करणारा असा हा चित्रपट आहे.
हा विषय अतिशय गंभीर आणि संवेदनशील आहे आणि तो रुपेरी पडद्यावर मांडण्याचे धाडस निर्माते विपुल अमृतलाल शहा आणि दिग्दर्शक सुदिप्तो सेन यांनी केले आहे.अत्यंत संवेदनशील, भावनाप्रधान तसेच विचार करायला लावणारा असा हा चित्रपट आहे. केरळमधील तीन मुलींची सत्य कथा या चित्रपटात मांडण्यात आली आहे. चित्रपटाच्या कथानकाला सुरुवात होते ती अफगाण येथे सुरक्षा अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलेल्या फातिमा अर्थात शालिनी उन्नीकृष्णन (अदा शर्मा) पासून. तिला दहशतवादी म्हणून त्यांनी ताब्यात घेतलेले असते. मात्र ती आपण दहशतवादी नसून एक पीडित मुलगी आहे असे सांगण्याचा आणि ते पटवून देण्याचा प्रयत्न करते. साहजिकच मग कथानक फ्लॅशबॅकपासून सुरू होते.
Also Read - Fatty Liver Disease: संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार
शालिनी उन्नीकृष्णन (अदा शर्मा), गीतांजली (सिद्धी इदनानी) व नीमा (योगिता बिहानी) या तिघीही मध्यमवर्गीय कुटुंबातील तरुणी. त्या एका नर्सिंग होममध्ये शिकायला आलेल्या असतात. त्या तिघींची आसिफा (सोनिया बालानी) ही आणखीन एक मैत्रीण असते. त्या चौघीही एकाच खोलीत राहात असतात. त्यांच्यामध्ये हळूहळू मैत्रीचे नाते निर्माण होते. मात्र आसिफाच्या कुटील हेतूविषयी शालिनी, गीतांजली व नीमा या तिघींनाही काहीही कल्पना नसते. आसिफाचा एक छुपा अजेंडा असतो. ती आपल्या खोलीत राहणाऱ्या मुलींना त्यांच्या कुटुंबापासून तसेच त्यांच्या धर्मापासून दूर नेण्याचा प्रयत्न करीत असते. त्याकरिता ती त्या तिघींचेही सातत्याने ब्रेनवॉश करीत असते.
आपलाच इस्लाम धर्म कसा कसा श्रेष्ठ आहे हे सांगण्याचा प्रयत्न करते. त्याकरिता ती आपल्या दोन खोट्या भावांचा आधार घेते. तिचे ते दोन खोटे भाऊ आणि त्या तिघी जणी यांच्यामध्येही मैत्रीचे नाते निर्माण होते. मग आसिफा आणि तिचे ते दोन भाऊ असा काही सापळा रचतात की त्या मुली अलगदपणे त्यांच्या जाळ्यात अडकत जातात. त्यानंतर कशा आणि कोणत्या घडामोडी घडतात हे प्रत्यक्ष पडद्यावर पाहिलेले बरे. आपल्या देशातील सगळ्यात साक्षर राज्य म्हणजे केरळ. तेथील हे भीषण वास्तव दिग्दर्शक सुदिप्तो सेनने मांडलेले आहे.
केरळातील हजारो हिंदू मुलींचे कधी प्रेमाने तर कधी बळजबरीने धर्मांतर घडवून आणले जाते आहे....कित्येक मुली गायब केल्या जात आहेत. त्यांना दहशतवादी संघटना इसिसमध्ये कसे सामील करून घेतले जाते... ही भीषण आणि दाहक कहाणी या चित्रपटात मांडण्यात आली आहे. अदा शर्माने आपली भूमिका कमालीची साकारली आहे. तिच्या भूमिकेला विविध शेड््स आहेत. शालिनीची भूमिकेतील निरागसता तसेच तिचा उत्साह त्याचबरोबर फातिमाच्या रुपातील तिची भीती, वेदना तसेच अस्वस्थता वगैरे बाबी तिने पडद्यावर छान मांडल्या आहेत. योगिता बिहानी, सिद्धी इदनानी यांनीही शालिनीच्या मैत्रिणीची भूमिका छान साकारली आहे.
प्रणव मिश्रा, प्रणय पचौरी आदी कलाकारांनीही आपापल्या वाट्याला आलेल्या भूमिका उत्तम साकारल्या आहेत. चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी उत्तम झाली आहे. केरळ तसेच अफगाणिस्तानातील दृश्ये सिनेमॅटोग्राफर प्रशांतनु मोहापात्रा यांनी आपल्या कॅमेऱ्यात छान बंदिस्त केली आहेत. चित्रपटातील संवाद आपल्या मनातील भावना चेतावणारे आहेत. चित्रपटातील संगीत प्रसंगानुरूप आहे आणि ते कथेला पुढे घेऊन जाणारे झाले आहे.
मात्र चित्रपटातील काही दृश्ये अतार्किक आणि हिंस्त्र आहेत. चित्रपटातील काही मुद्दे तथ्यहीन आहेत. ते मनाला अजिबात पटत नाहीत. त्यामुळे दिग्दर्शकाचा काहीसा गोंधळ झालेला दिसतो. चित्रपटाच्या शेवटी हा चित्रपट सत्य घटनेवर असल्याचे काही पुरावे देण्यात आले आहेत. असो. एकूणच हा चित्रपट म्हणजे मन अस्वस्थ करणारा आहे. केरळमधील भीषण वास्तव मांडणारा आहे.
चित्रपटाचे नाव - द केरळ स्टोरी
रेटिंग - साडेतीन स्टार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.