The Kerala Story esakal
मनोरंजन

The Kerala Story Review : 'काळ्या बुरख्या' आड दडलेलं 'कुटील षडयंत्र'!

The Kerala Story Movie: हिंदू धर्माला ठेवली नावं, देवतांचा केला उद्धार केरळमध्ये नेमकं चाललंय तरी काय?

युगंधर ताजणे

The Kerala Story Review Sudipto Sen Vipul Shah : 'द केरळ स्टोरी'चा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर एकुणच चित्रपट काय असणार आहे याची कल्पना प्रेक्षकांना आली होती.

हल्ली कोणताही चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी त्यावरुन वाद न झाल्यास आश्चर्याची बाब म्हणावी लागेल. गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटानं वातावरण निर्मिती सुरु केली आणि त्याचा परिणामही जाणवू लागला आहे. केरळ स्टोरीबाबत अनेकांनी सर्वोच्च न्यायालयापर्यत धाव घेतली होती.

तुम्ही जर जेवण्यापूर्वी देवाची प्रार्थना करत नसाल तर ते पाप आहे. आणि आमच्या अल्लाला तर ते मान्य नाही. तुमचा देव या त्याच्या पत्नीला एकटं सोडून कसा काय जातो, तो तर भित्रा आहे जो स्वताचे संरक्षण करु शकत नाही तो तुमचे कसे काय रक्षण करणार असे प्रश्न नर्सिंग होममधील ती आपा जेव्हा त्या तीन मुलींना विचारते तेव्हा त्यांच्याकडे त्या प्रश्नांची उत्तरं नाहीत.

त्यांनाही काही शंका आहेत, धर्म म्हणजे काय, तो काय करतो, मात्र यासगळ्यात आपा त्यांच्या मेंदूचा ताबा केव्हा घेते आणि त्यांना आपल्या तालावर नाचण्यास भाग पाडते हे शालिनी, निमोह आणि गीतांजलीला कळूनही येत नाही.

Also read - Fatty Liver Disease: संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

विपुल अमृतलाल शाह निर्मित आणि सुदिप्तो सेन दिग्दर्शित या चित्रपटानं प्रेक्षकांना केरळ राज्यातील एका ज्वलंत प्रश्नाची ओळख करुन दिली आहे.

त्या दाहक वास्तवाची कुणालाही कल्पना कशी नाही आणि शासन, व्यवस्था यांच्याकडून मिळणारा प्रतिसाद किती थंड आहे याकडेही दिग्दर्शकानं लक्ष वेधले आहे. यापूर्वी केरळमधील ३२ हजार मुलींनी धर्मांतर केल्याच्या बातम्या व्हायरल झाल्या होत्या.

नंतर दिग्दर्शकानं ही गोष्ट त्या तीन मुलींची आहे हे सांगून आपल्याला लव जिहादचा प्रश्न किती गंभीर वाटतो हे चित्रपटातून पटवून देण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले होते.

अफगाणिस्तान, सीरियाच्या सीमेवर असणाऱ्या संयुक्त राष्ट्र संघाच्या एका तुरुंगामध्ये बंदिस्त आहे. ती आंतरराष्ट्रीय गुन्हेगार असून तिच्यावर वेगवेगळे आऱोप ठेवण्यात आले असून तिची चौकशी सुरु आहे.

त्यात तिला तुझ्या सुटकेसाठी तू खरी माहिती सांग असे सांगून तिला बोलतं करण्याचा प्रयत्न पोलीस करतात. तेव्हा फातिमा बोलू लागते मी आयसीसमध्ये गेली हे तुम्ही म्हणता पण मी त्याचा भाग का झाले, त्याचे कारण काय होते हे तर जाणून घेणार आहात की नाही असे सांगून फातिमाचा प्रवास उलगडू लागतो.

फ्लॅशबॅकच्या माध्यमातून द केरळ स्टोरी आपल्यासमोर येऊ लागतो. आपण जेवढी साधी सोपी गोष्ट समजतो तेवढी ती नाही. जिला आपण फातिमा म्हणून ओळखतो ती मुळची शालिनी उन्नीकृष्णन आहे.

एका मध्यमवर्गीय कुटूंबातून मोठी स्वप्नं घेऊन ती एका नर्सिंग कॉलेजमध्ये आली आहे. तिथे तिची ओळख आणखी दोन मैत्रीणींशी होते. त्यातील एक ख्रिश्चन आहे तर आणखी एक हिंदू आहे. या तिघींमध्ये ती एक मुस्लिम आपा आहे जी त्या तिघींचा ब्रेन वॉश करते ते भयानक आहे.

आपा नियमित वेळची नमाजी आहे. कट्टर धार्मिक आहे. ती प्रत्येकवेळी इस्लाम, इस्लामची विचारधारा आणि अल्लाहनं कशाप्रकारे सर्वसामान्य माणसाला जीवन व्यतीत करायला सांगितले आहे हे सांगताना दिसते.

शालिनी, निमाह आणि गीतांजलीला देखील त्यावरुन प्रश्न पडतात. पण आपाची इस्लामवर असलेली पकड, ती विचारधारा पटवून देण्याचे कौशल्य दिग्दर्शकानं प्रभावीपणे आपल्यासमोर मांडले आहे. इथूनच हा चित्रपट आपल्या मनाची पकड घ्यायला लागतो.

विश्वास संपादन करुन आपा तिघींची 'त्या' कामासाठी निवड करते. त्यानंतर आपल्याला कळतं की, काळ्या बुरख्याआड चालणारं कुटील कारस्थान आणि त्याची व्याप्ती किती मोठी आहे ते, दिग्दर्शकानं यावेळी संवाद, प्रतिमा, प्रतिकं याचा वापर करत हिंदू धर्मिय आणि विरोधी पक्षातील कट्टरता यांच्यातील वाद अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणून तर थिएटरमध्ये हा चित्रपट पाहताना प्रेक्षकांच्या तोंडून घोषणाबाजी केव्हा सुरु होते हे कळत नाही.

आयसीस, दहशतवादी संघटना त्यांचे भारतातील कनेक्शन, तसेच अफगाणिस्तान, सीरिया, इराक देशात चाललेल्या घातपायी कारवाया हे सारं आपल्याला चक्रावून टाकणारं आहे.

त्यामुळेच की काय आपण द केरळ स्टोरीच्या निमित्तानं जे काही पाहतो त्यामागे एवढे भयानक संदर्भ आहेत हे कळल्यावर डोके गरगरायला लागते. कोणत्याही विचारधारेची कट्टरता ही वाईटच.

त्याचा अतिरेक आपल्याला सद्सदविवेक बुद्धीनं विचार करण्याची संधी देत नाही. द केरळ स्टोरीमध्ये निष्पाप मुलींचा उपयोग ज्या हेतूसाठी करुन घेतला जातो आहे हे सगळं दिग्दर्शक कमालीच्या वेदननं आपल्यासमोर मांडून मोकळा होतो.

मध्यंतरापूर्वी चित्रपट काहीसा रेंगाळला आहे. मात्र त्यानंतर त्यानं पकडलेला वेग आपल्यापुढे वेगवेगळे प्रश्न उपस्थित करतो. चित्रपटाच्या शेवटी दिग्दर्शकानं ज्यांच्याबाबत ही भयानक घटना घडली आहे त्यांच्या कुटूंबियांशी संवाद साधतो.

त्यांना बोलतं करतो. हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित आहे असे सांगून द केरळ स्टोरी मधून भविष्यातील चिंताही आपल्यासमोर ठेवतो. मला जे सांगायचे ते मी सांगितले तुम्ही हे पाहून गांभीर्यानं विचार करा. कोणत्या विचारधारेचा तुम्ही पुरस्कार करणार आणि त्यामागील तुमची भूमिका काय असावी हे दिग्दर्शक सांगण्यास विसरलेला नाही.

द केरळ स्टोरीमधील कलाकार, अदा शर्मा, योगिता बिहानी, सोनिया बलानी यांनी केलेल्या भूमिका दमदार आहेत. या नवोदित अभिनेत्रींनी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. खासकरुन अदा शर्मानं जी भोळ्या भाबड्या फातिमाची साकारलेली भूमिका खूप काही सांगून जाणारी आहे.

तिच्या चेहऱ्यावरील हावभाव, आयसीसमध्ये सहभागी होण्यापूर्वीची अदा, तिचा निरागसपणा हे सारं प्रभावी आहे. चित्रपटातील गाणीही आशय स्पष्ट करणारी आहेत. सर्वात महत्वाचे म्हणजे द केरळ स्टोरीमधील संवादही बोलके आहे.

एकुणच ज्यांनी द काश्मीर फाईल्स पाहिला असेल त्यांच्यासाठी हा चित्रपट फारसा वेगळा अनुभव देणारा नसेल. मात्र जे कुणी पहिल्यांदाच वेगळ्या धाटणीच्या आणि विषयाच्या चित्रपटाच्या वाट्याला जात असतील त्यांच्यासाठी हा धक्कादायक अनुभव असू शकतो. जे घडलं आहे ते सत्य आहे असे सांगून दिग्दर्शकानं एका वेगळ्या गोष्टीकडे लक्ष वेधले आहे.

----------------------------------------------------------------------------------------------

चित्रपटाचे नाव - द केरळ स्टोरी

दिग्दर्शकाचे नाव - सुदिप्तो सेन, विपुल अमृतलाल शहा (क्रिएटिव्ह डिरेक्टर)

कलाकारांची नावं - अदा शर्मा, योगिता बिहानी, सानिया मीर, सिद्धी इरानी

रेटिंग - ***

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारणार! उद्धव ठाकरेंची कोल्हापूरात घोषणा, महायुतीवर हल्लाबोल

सुशांत सिंग राजपूतची हत्याच! सलमानची एक्स गर्लफ्रेंड सोमी अलीचा धक्कादायक दावा; म्हणाली- एम्सच्या डॉक्टरने रिपोर्ट...

IPS Sanjay Verma : राज्याच्या पोलीस महासंचालकपदी संजय वर्मा यांची नियुक्ती

Ladki Bahin Yojana : तुम्ही बळ दिलं तर... लाडक्या बहीणींना मुख्यमंत्र्यांचं मोठं आश्वासन; डिंसेंबरच्या हप्त्याबद्दलही सांगितलं

Dhule Vidhan Sabha Election 2024 : धुळे जिल्ह्यात बंडखोरांकडून आव्हान उभे; पाचही मतदारसंघांत मतविभाजनाचे डावपेच

SCROLL FOR NEXT