The Kerala Story Controversy Instagram
मनोरंजन

'The Kerala Story' ब्रिटिशांना का खटकला?,यूके मध्ये आयत्यावेळी प्रदर्शनावर बंदी

'द केरळ स्टोरी' वादात सापडला असला तरी प्रेक्षकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत असल्यानं जगभरात जास्तीत-जास्त सिनेमागृहात आता रिलीज केला गेलाय.

प्रणाली मोरे

The Kerala Story Controversy: सुदीप्तो सेनच्या 'द केरळ स्टोरी' सिनेमाचा वाद भारतात काही संपायचं नाव घेईना. आता याचा वणवा लंडनपर्यंत पसरलेला दिसून येतोय. तिथे ब्रिटिश बोर्ड ऑफ फिल्म क्लासिफिकेशन म्हणजे BBFC नं या सिनेमाला कोणतंच सर्टिफिकेट दिलेलं नाही. या कारणानं तेथील एक भारतीय गट रागात आहे.

अर्थात BBFC नं जेवढ्या तिकिटांची विक्री झाली होती त्याचे पैसे रिफंड केले आहेत आणि या सिनेमाचं प्रदर्शन रद्द केलं आहे. हा सिनेमा यूके मधील ३१ सिनेमागृहात १२ मे रोजी हिंदी आणि तामिळ भाषेमध्ये रिलीज होणार होता. पण सगळ्याच सिनेमाघरांच्या वेबसाईटवर या सिनेमाच्या तिकीट विक्रीवर बंदी आणली गेली आहे आणि शो कॅन्सल केले आहेत.

सलोनी नावाच्या एका महिलेनं बुधवारी सिनेवर्ल्ड मध्ये 'द केरळ स्टोरी' पाहण्यासाठी ३ तिकीटं खरेदी केली होती पण शुक्रवारी १२ मे रोजी तिला एक मेल आला ज्यात लिहिलं होतं की- ''सिनेमाला सर्टिफिकेट न मिळाल्याकारणानं BBFC नं 'द केरळ स्टोरी' सिनेमाचं बुकिंग रद्द करण्याचा फतवा काढला आहे. आम्ही याचे पैसे पूर्ण परत देत आहोत. तुमच्या असुविधेसाठी आम्ही माफी मागतो''.

त्या महिलेनं टाईम्स ऑफ इंडियाला सांगितलं की,''अनेक लोकांनी हा सिनेमा विकेंडला पाहण्याचा प्लॅन बनवला होता आणि ९५ टक्के सीट्स फुल्ल झाल्या होत्या. पण शो आयत्यावेळेस कॅन्सल केला''.(The Kerala Story screening cancelled in UK? Know the reason)

BBFC ने सांगितलं की,''द केरळ स्टोरी संदर्भातील सर्टिफिकेशन प्रोसेस सुरू आहे. जसं या या सिनेमाला सर्टिफिकेट किंवा कंटेंट अॅडवाईज मिळेल तसं लगेच युकेच्या सिनेमागृहात सिनेमा दाखवला जाईल''.

तसंच,या सिनेमाचे युके मधील डिस्ट्रिब्युटर सुरेश वरसानी जे २४ seven FLIX4U चे डायरेक्टर देखील आहेत त्यांनी सांगितलं की,'' ही खूपच चिंतेची गोष्ट आहे, त्यांनी या सिनेमाला BBFC कडे बुधवारी दिलं होतं आणि याचे तीन व्हर्जन होते-हिंदी,तामिळ आणि मल्याळम. एक त्यांनी बुधवारी आणि बाकी दोन गुरुवारी सर्टिफिकेशनसाठी दिले होते. अशामध्ये सिनेमासंदर्भातील सर्टिफिकेट देण्याची प्रोसेस त्याच दिवशी पूर्ण व्हायला हवी होती. पण तसं झालं नाही. जेव्हा आम्ही त्यासंदर्भात प्रश्न विचारला तर त्यांच्याजवळ कोणतंच उत्तर नव्हतं..योग्य कारणही नव्हतं''.

सुरेश वरसानी पुढे म्हणाले,''एक सर्टिफिकेट द्यायला तीन दिवसांहून जास्त वेळ का लागतोय, हे काही केल्या कळत नाही. इथे युएसए,भारत,ऑस्ट्रेलिया,कॅनडा,आयर्लंडनं लागलीच सिनेमाला सर्टिफिकेट दिलं होतं. पण युकेमध्ये काय अडचण आहे कळत नाही. हे सगळंच समजण्यापलिकडचं आहे''.

बातमी आहे की युके सिनेमाचं यामुळे जवळपास ४० ते ५० लाखाचं नुकसान झालं आहे. माहितीनुसार,युकेची हिंदू समुदाय संघटना जी ४५००० हिंदू आणि जैन लोकांचे प्रतिनिधित्व करते,त्यांनी BBFC ला लिखित स्वरुपात निवेदन दिलं आहे आणि त्यांना विनंती केली आहे की त्यांनी या प्रकरणात लवकरात लवकर दखल घ्यावी.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT