The Kerala Story Controversy Instagram
मनोरंजन

The Kerala Story चा वाद काही थांबता थांबेना.. तामिळनाडूत सिनेमाविरोधात उचललं मोठं पाऊल

'द केरळ स्टोरी' सिनेमा देशभरात प्रदर्शित झाल्यानंतर संमिश्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत.

प्रणाली मोरे

The Kerala Story: अदा शर्मा अभिनित 'द केरळ स्टोरी' सिनेमाचा वाद काही संपता संपेना आणि आता तामिळनाडू मल्टिप्लेक्स असोसिएशननं रविवारी सिनेमाच्या प्रदर्शनवरच बंदी आणल्याचं कळत आहे. दिग्दर्शक सुदीप्तो सेन सिनेमाच्या रिलीजनंतर जोरदार चर्चेत आहे. सिनेमामुळे निर्माण झालेला वाद आणि बॉक्सऑफिसवर सिनेमाला मिळत नसलेला प्रतिसाद या दोन कारणांमुळे सिनेमाच्या प्रदर्शनावर बंदी आणल्याचं बोललं जात आहे.

तामिळनाडू मल्टिप्लेक्स असोसिएशननं पीटीआयशी साधलेल्या संवादात म्हटलं आहे की,''हा सिनेमा पॅन इंडिया ग्रुप्स म्हणजे खासकरून पीव्हीआरच्या काही मल्टिप्लेक्सेस मध्ये दाखवला जात होता. लोकल मल्टिप्लेक्सनं याआधीच सिनेमा रिलीज न करायचा निर्णय घेतला होता कारण या सिनेमात कुणीच प्रसिद्ध स्टार नाही''.

''जसं कोयम्बतूरमध्ये आतापर्यंत केवळ २ शो झाले-एक शु्क्रवारी आणि दुसरा शनिवारी. त्यांनी देखील खास प्रदर्शन केलं नाही. याला पाहिल्यानंतर थिएटर्सनी निर्णय घेतला आहे की सिनेमाला होणारा विरोध आणि त्यामुळे संभाव्य धोका पाहता सिनेमा काही फारसा तरणार नाही हे स्पष्ट होत आहे,त्यापेक्षा प्रदर्शन थांबवलेलं बरं''.(Tamil Nadu Multiplex owners halt screenings of the kerala story)

राज्यात द केरळ स्टोरी च्या प्रदर्शनास बंदीची मागणी होत असताना 'नाम तामिलर काची' च्या विरोधानंतर ७ मे पासून सिनेमाच्या स्क्रीनिंगवर बंदी आणण्याचा निर्णय घेतला गेला आहे. बोललं जात आहे की सिनेमाविरोधात प्रदर्शन करणाऱ्यांनी लोकांना सिनेमा न पाहण्याचा आणि थिएटर मालकांना सिनेमा प्रदर्शित न करण्याची धमकी देखील दिली आहे.

एका वाहिनीच्या रिपोर्टनुसार राज्यसरकारला सिनेमावर बंदी देखील घालायची नाही आणि सिनेमा अधिक चालवायचा देखील नाही. बोललं जात आहे की मल्टिप्लेक्स त्यांनी घेतलेल्या निर्णयासाठी कायदेशीर सुव्यवस्था सिनेमामुळे बिघडू नये हे कारण पुढे करत आहे. मदुराई इथल्या एका थिएटर मॅनेजरनं तर आरोप केला आहे की पोलिसांनी सिनेमाच्या स्क्रीनिंग विरोधात याआधीच सतर्क रहायला सांगितलं होतं.

माहितीसाठी सांगतो की द केरळ स्टोरी ५ मे रोजी देशभरातील थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. अनेक प्रेक्षकांनी सिनेमा पाहिल्यावर त्याची प्रशंसा केली आहे आणि अनेकजण सिनेमाला प्रोपगेंडा म्हणताना दिसत आहेत.

मेकर्सचा दावा आहे की हा सिनेमा सत्य घटनेवर आधारित आहे. 'द केरळ स्टोरी' मध्ये दावा केला आहे की केरळच्या ३२ हजार हिंदू आणि ख्रिश्चन धर्मिय मुलींना मुसलमान धर्म स्विकारण्याची जबरदस्ती केली गेली होती आणि त्यानंतर त्यांना आयएसआय मध्ये सामिल केलं गेलं होत..आणि जोरजबरदस्ती करत सीरियाला पाठवलं गेलं होतं.

या मुद्द्यावरनं देशभरात वादाची लाट उसळली आहे. या सिनेमातील तब्बल १० सीनला कात्री लावल्यानंतरच ए सर्टिफिकेट देण्यात आलं आहे.

'द केरळ स्टोरी' सिनेमाची निर्मिती विपुल अृतलाल शहा यांची असून यामध्ये योगिता बिहानी,सोनिया बलानी,सिद्धी इडनानी,अदा शर्मा मुख्य भूमिकेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan East Assembly Election 2024 Result Live: कल्याण पूर्वमध्ये उद्धव ठाकरे गटाला धक्का; सुलभा गायकवाड यांचा दणदणीत विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: महाराष्ट्रानं मतदान केलंय की ईव्हीएम नं केलंय; आदित्य ठाकरेंचा सवाल

Arjuni-Morgaon Assembly Election Result 2024: अर्जुनी मोरगाव मतदारसंघात राजकुमार बडोले आघाडीवर

Santosh Bangar Won Kalmanuri Assembly Election 2024 Result : संतोष बांगर विजयी; डॉ. संतोष टारफे यांचा पराभव

Ulhasnagar Assembly Election 2024 Result Live: उल्हासनगरमध्ये पुन्हा भाजपाचीच सत्ता; कुमार आयलानी यांचा विजय, ओमी कलानींना धक्का

SCROLL FOR NEXT