Chatrapathi  Sakal
मनोरंजन

Chatrapathi: जो सगळ्यांसाठी जगतो तोच खरा 'छत्रपती' ढासू ट्रेलर रिलीज... येताच व्हायरल

तेलुगू अभिनेता बेल्लमकोंडा साई श्रीनिवासचा 'छत्रपती' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

Aishwarya Musale

तेलुगू अभिनेता बेल्लमकोंडा साई श्रीनिवासचा 'छत्रपती' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. बेल्लमकोंडा साई श्रीनिवास या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. हा चित्रपट सुपरस्टार प्रभासच्या त्याच नावाच्या ब्लॉकबस्टर चित्रपटाचा रिमेक आहे, ज्याचे दिग्दर्शन एसएस राजामौली यांनी केले होते.

प्रभासचा ब्लॉकबस्टर तेलुगू चित्रपट छत्रपती याच नावाने अभिनेता बेल्लमकोंडा साई श्रीनिवास हिंदी प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे.

चित्रपटाच्या स्टारकास्टच्या उपस्थितीत आज मुंबईत एक ग्रँड ट्रेलर लॉन्च कार्यक्रम पार पडला. काही वेळापूर्वी छत्रपती या चित्रपटाचा अधिकृत ट्रेलर लाँच झाला आणि यूट्यूबवर रिलीज झाला. ट्रेलरमध्ये बेल्लमकोंडा श्रीनिवासाची जबरदस्त अॅक्शन पाहायला मिळत आहे. या चित्रपटात तो हाय-ऑक्टेन अॅक्शन सीक्वेन्स करताना दिसत आहे.

हा चित्रपट 12 मे 2023 रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. बेल्लमकोंडा श्रीनिवास व्यतिरिक्त या चित्रपटात नुसरत भरुचा आणि शरद केळकर यांच्याही भूमिका आहेत. प्रभासचा हा चित्रपट 2005 मध्ये रिलीज झाला होता. 18 वर्षांनंतर बेल्लमकोंडा श्रीनिवास आणि नुसरत भरुचा यांच्यासोबत हा चित्रपट हिंदीत रिमेक करण्यात आला आहे. हिंदीतील छत्रपती वीवी विनायक दिग्दर्शित करत आहेत. विनायक यांनी अनेक साऊथ हिट चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे.

एसएस राजामौली दिग्दर्शित तेलुगू 'छत्रपती' चित्रपटाची कथा एक तरुण शिवाजी आणि त्याच्या कुटुंबाची आहे. शिवाच्या कुटुंबाला श्रीलंकेतील त्यांच्या समुदायापासून वेगळे केले जाते आणि विशाखापट्टणममध्ये बंधपत्रित कामगार म्हणून ठेवले जाते. शिव मग अन्यायाविरुद्ध उभा राहतो आणि लोकांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करतो. प्रेक्षकांना हा चित्रपट खूप आवडला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT