Ileana D'Cruz News: साऊथ आणि बॉलीवूड मधली प्रसिद्ध अभिनेत्री इलियाना डिक्रुज सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत असते. इलियानाला तामिळ इंडस्ट्रीतुन बॅन केलंय अशी बातमी वाऱ्यासारखी पसरली.
इलियानाच्या सर्व फॅन्सच्या यामुळे भुवया उंचावल्या गेल्या. पण आता याच गोष्टीबद्दल मोठी माहिती उघडकीस आलीय. इलियानाला तामिळ इंडस्ट्रीतुन बॅन केलंय कि नाही याबद्दल खुलासा झालायइलियानाला तामिळ इंडस्ट्रीतुन बॅन केलंय कि नाही याबद्दल खुलासा झालाय. बघूया..
(The truth about the ban on Ileana D'Cruz by the Tamil industry came out)
इलियानाला बॅन का केलं गेलं होतं?
रिपोर्ट्सनुसार, इलियाना डिक्रूझने एका तमिळ सिनेमासाठी आगाऊ रक्कम घेतली होती, परंतु तिने पैसे घेऊनही त्या सिनेमाचं शूटिंग केलं नाही. यामुळे त्या चित्रपट निर्मात्याचे मोठे नुकसान झाल्याचे सांगितले जाते.
पुढे त्या प्रोड्युसरने निर्माता परिषदेकडे तक्रार केली. मिळालेल्या तक्रारीनुसार तामिळ चित्रपट निर्मात्यांनी इलियानाला कोणत्याही चित्रपटासाठी साईन न करण्याचा निर्णय घेऊन तिला बॅन केले.
या चर्चांमध्ये किती सत्य आणि किती खोटं?
इंडिया टुडेने दिलेल्या रिपोर्टनुसार, या संपूर्ण प्रकरणाची सत्यता जाणून घेण्यासाठी तमिळ फिल्म प्रोड्यूसर्सशी (TFPC) चर्चा करण्यात आली. तेव्हा हा अहवाल पूर्णपणे चुकीचा असल्याचे सांगण्यात आले.
TFPC कडून अशी कोणतीही बंदी इलियानावर घालण्यात आलेली नाही, असे टीएफपीसी परिषदेचं म्हणणं आहे. त्यामुळे या चर्चांमध्ये कोणताही तथ्य नसून या केवळ अफवा असल्याचं स्पष्ट झालंय
याशिवाय इलियानाच्या बॅन करण्याची अफवा पसरवण्यात तिच्या फॅन्सचा सुद्धा तितकाच हात आहे असं बोललं जातंय. इलियानाने जेव्हा बॉलिवूडमध्ये आपल्या करिअरची सुरुवात केली तेव्हा ती टॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री होती.
परंतु बॉलिवूड मध्ये प्रसिद्ध झाल्यावर तिने साऊथच्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले नाही. साऊथ मध्येही इलियानाही फॅन फॉलोविंग खूप जास्त आहे. परंतु नंतर तिने साऊथ इंडस्ट्रीमध्ये काम करायला प्राधान्य दिल नाही.
ती शेवटी 2018 मध्ये रवी तेजाच्या 'अमर अकबर अँथनी'मध्ये दिसली होती. त्यामुळे फॅन्सनी या कारणामुळे इलियानाला बॅन केलं असल्याची बातमी पसरवली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.