The Vaccine War Trailer Releasaed Vivek Agnihotri esakal
मनोरंजन

The Vaccine War Trailer : 'खरं सांगा तो व्हायरस खरा होता की खोटा'? 'काश्मिर फाईल्स' च्या अग्निहोत्रींची नवी कलाकृती

कोविडवरील लसीकरणावर प्रसिद्ध दिग्दर्शक द काश्मिर फाईल्सचे निर्माते विवेक अग्निहोत्री यांनी द व्हॅक्सिन वॉर यांनी चित्रपटाची घोषणा केली होती.

युगंधर ताजणे

The Vaccine War Trailer Releasaed Vivek Agnihotri : कोविडनंतर साऱ्या जगाची परिस्थिती बदलून गेली. यामध्ये गरीब आणि श्रीमंत असा कोणताही भेद राहिला नव्हता. या आजारानं सगळ्यांनाच एका समान पातळीवर आणून सोडले होते. कोविडमुळे खूप साऱ्या गोष्टी बदलल्या. यासगळ्यात कोविडवरील व्हॅक्सिनची महत्वाची भूमिका होती.

कोविडवरील लसीकरणावर प्रसिद्ध दिग्दर्शक द काश्मिर फाईल्सचे निर्माते विवेक अग्निहोत्री यांनी द व्हॅक्सिन वॉर यांनी चित्रपटाची घोषणा केली होती. आता या चित्रपटाचा ट्रेलर समोर आला आहे. साधारण अडीच मिनिटांच्या या ट्रेलरमध्ये कोविडच्या काळातील अनेक थरारक गोष्टींना, आठवणींना दिग्दर्शकानं उजाळा दिल्याचे दिसून आले आहे.

कोविडची व्हॅक्सिन तयार करण्याचे श्रेय भारतीय शास्त्रज्ञांना देण्यात येतं. त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या लशी तयार करुन कोट्यवधी भारतीयांना जीवनदान दिले होते. यासगळ्या प्रकरणावर अग्निहोत्री यांनी द व्हॅक्सिन वॉरच्या निमित्तानं प्रकाश टाकला आहे. एकुणच त्यावेळची परिस्थिती, अर्थकारण, राजकारण यावरही त्यांनी लक्ष केंद्रित केल्याचे दिसून आले आहे.

अग्निहोत्री यांच्या या चित्रपटामध्ये प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर एका शास्त्रज्ञाच्या भूमिकेत आहेत. याशिवाय अभिनेत्री पल्लवी जोशी, गिरीजा ओक, रायमा सेन यांच्याही भूमिका यात आहेत. हा चित्रपट याच महिन्यात २८ तारखेला प्रदर्शित होणार आहे. त्याच्या व्हायरल झालेल्या ट्रेलरला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळतो आहे. खासकरुन त्यातील संवाद हे अतिय बोलके आणि प्रभावी असल्याच्या प्रतिक्रियाही नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.

अग्निहोत्री यांनी काही दिवसांपूर्वी द व्हॅक्सीन वॉरबाबत सांगितले होते. केली होती. यापूर्वी त्यांनी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत अग्निहोत्री यांनी तो टीझर प्रदर्शित केला होता. त्याला प्रेक्षकांचा,नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. काहींनी अग्निहोत्री यांच्या या प्रोजेक्टसाठी शुभेच्छाही दिल्या होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बाळासाहेबांची मोठी भूमिका, पंतप्रधानांचा थेट सदानंद सुळेंना फोन... सुप्रिया सुळेंनी सांगितला लग्नाचा 'तो' किस्सा!

Share Market Opening: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात मोठी घसरण; सेन्सेक्स- निफ्टी लाल रंगात

'राज्यात पुन्हा महायुतीचीच सत्ता येणार, ते कोणी माई का लालही रोखू शकणार नाही'; अजितदादांचा कोणाला इशारा?

Gold Price: ओमान, यूएई, कतार आणि सिंगापूरच्या तुलनेत भारतात सोन्याचे भाव कमी; काय आहे कारण?

Mumbai Traffic: मुंबईच्या रस्ते वाहतुकीत उद्यापासून बदल, जाणून घ्या महत्त्वाची बातमी

SCROLL FOR NEXT