The Vaccine War Vivek Agnihotri movie Dr Balram Bhargava Story esakal
मनोरंजन

The Vaccine War: फक्त एक रुपया एवढचं मानधन घेतलं! कोण आहेत 'डॉ.बलराम भार्गव'?

यापूर्वी अग्निहोत्री यांच्या द काश्मिर फाईल्स नावाच्या चित्रपटानं संपूर्ण देशाला हादरवून टाकले होते.

युगंधर ताजणे

The Vaccine War Vivek Agnihotri movie Dr Balram Bhargava Story : प्रसिद्ध दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित द व्हॅक्सिन वॉरचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. त्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. त्यावरुन वेगवेगळ्या चर्चांनाही सुरुवात झाली आहे. निर्माती आणि अभिनेत्री पल्लवी जोशी यांचे एक ट्विट देखील व्हायरल झाले आहे.

यापूर्वी अग्निहोत्री यांच्या द काश्मिर फाईल्स नावाच्या चित्रपटानं संपूर्ण देशाला हादरवून टाकले होते. एका सत्य घटनेवर आधारित या चित्रपटानं अनेक चर्चांना तोंड फोडले होते. त्यावरुन मोठा वादही झाला होता. सोशल मीडियावर तर त्यावरुन उलट सुलट प्रतिक्रियाही समोर आल्या होत्या. राजकीय पातळीवर त्याची दखल घेण्यात आली होती.

Also Read - सारखी चक्कर येते? मग नका करु दुर्लक्ष...'हे' असू शकतं कारण!

त्यात अग्निहोत्री यांच्या द व्हॅक्सिन वॉर नावाच्या चित्रपटाची चर्चा आहे. त्यातून कोविडच्या वेळेस देश ज्या परिस्थितीला सामोरा गेला, देशातील शास्त्रज्ञांनी मोठ्या प्रयत्नानं जी लस तयार केली त्यामुळे किती फायदा झाला, दरम्यान आलेल्या अडचणी, वाद याला वेगळ्या प्रकारे सादर करण्याचा प्रयत्न अग्निहोत्री यांनी केला आहे. याविषयी अधिक माहिती सांगणारं पल्लवी जोशी यांचे ट्विट व्हायरल झाले असून त्याची चर्चा होत आहे.

पल्लवी जोशी यांनी म्हटले आहे की, लोकांना वाटते हा कोविडवरील चित्रपट आहे, पण त्यांना सांगायचे आहे केवळ कोविड नाहीतर व्हॅक्सिनेशन, व्हॅक्सिन यावर प्रभावीपणे भाष्य करणारा हा चित्रपट आहे. दरम्यान या चित्रपटातील डॉ.बलराम भार्गव यांची जोरदार चर्चा होत आहे. पल्लवीनं सांगितलं आहे की, त्यांनी या चित्रपटासाठी केवळ एक रुपया मानधन घेतलं आहे. त्यामुळे यासगळ्यात डॉ. भार्गव हे नेमके आहेत तरी कोण याची चर्चा सुरु झाली आहे.

डॉ. बलराम भार्गव हे आयसीएमआरचे माजी डीजी आहेत. भार्गव यांनी द व्हॅक्सिन वॉर बनविण्यासाठी अग्निहोत्री यांची खूप मदत केली आहे. त्यांना शास्त्रीय, वैद्यकीय बाजू समजावून सांगितली आहे. चित्रपट ज्याविषयावर आधारित आहे तो विषय प्रभावीपणे प्रेक्षकांपुढे मांडता यावा यासाठी भार्गव यांचे योगदान महत्वाचे असल्याचे सांगण्यात येते. द व्हॅक्सिन वॉरच्या माध्यमातून १३० कोटी जनतेला भारतीय शास्त्रज्ञ त्यांनी केलेली महत्वाची कामगिरी याविषयी सांगण्यात येणार आहे.

पल्लवी जोशीनं एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं की, द व्हॅक्सिन वॉर हा डॉ.बलराम भार्गव यांच्या गोईंग वायरल - द मेकिंग ऑफ कोव्हॅक्सिन या पुस्तकावर आधारित आहे. कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर डॉ. भार्गव यांच्या या पुस्तकाविषयी माहिती झाले. त्यांनी त्यात व्हॅक्सिनच्या प्रवासाविषयी सांगितले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prakash Ambedkar: “सध्या धर्म नव्हे, आरक्षण संकटात”; ओबीसींनी वंचितसोबत राहण्याचं आंबेडकरांचं आवाहन

Rahul Gandhi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही स्मृतिभ्रंशाचा आजार; आता ते आमचेच भाषण चोरत आहेत

Rajnath Singh : राहुल गांधी तुम्ही, आता जातगनणेची "ब्लु प्रिंट' जनतेसमोर आणाचं

ST Passengers : लालपरीच्या प्रवाशांत तीन वर्षांत ५० हजाराने वाढ; पुणे विभागाला आणखी १६० बसची आवश्यकता

Pakistan Army: पाकिस्तानच्या लष्करी तळावर दहशतवादी हल्ला! ७ सैनिक ठार, १५ जखमी

SCROLL FOR NEXT