Gadar 2 Manish Wadhwa News: गदर 2 सिनेमा प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे. सिनेमाने बॉक्स ऑफीसवर सुद्धा बंपर कमाई केलीय. गदर 2 सिनेमा तारा सिंग आणि भारत - पाकीस्तानच्या पार्श्वभुमीची कथा सांगतो.
सनी देओलचा तारा सिंग गदर 2 निमित्ताने पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनात घर करुन जातोय. गदर निमित्ताने तारा सिंगच्या तोडीस तोड उभा राहिलाय तो म्हणजे खलनायकाच्या भुमिकेत असलेला अभिनेता मनीष रंधावा.
मनीषच्या भुमिकेचं सगळीकडे कौतुक होतंय. मनीषबद्दल एक रंजक माहिती समोर आलीय, ती म्हणजे मनीषने गेली १२ वर्ष डोक्यावर एकही केस उगवू दिला नाही. काय आहे यामागचं कारण? आम्ही सांगतो.
(The villain of Gadar 2 manish wadhwa hasn't grown a single hair on his head for 12 years, here's a reason)
मनीष वाधवाने TV9 हिंदी डिजिटलशी दिलेल्या मुलाखतीत डोक्यावर केस नसण्याचे मजेदार कारण सांगितले आहे.
मनीषच्या आयुष्यातला सर्वात मोठा बदल 'चाणक्य' नंतरच झाल्याचे त्याने सांगितले. मनीष चाणक्यच्या भुमिकेला लाइफ चेंजर म्हणतो. जवळपास दहा वर्षांपुर्वी 22 डिसेंबर 2010 ला बडोद्यात मनीष गेला होता.
तेव्हा प्रॉडक्शनने मनीषला सांगितले की त्याला डोक्याचं मुंडन करावं लागेल. परंतु मनीष केस कापावे की नाही या संभ्रमात होता. कारण केस त्याच्यासाठी जीव की प्राण होता. याशिवाय केस एकदा कापले की पुन्हा येतील की नाही असा प्रश्न मनीषच्या मनात होता.
याआधी डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी यांनी चाणक्यची व्यक्तिरेखा खूप छान रंगवली होती. त्यानंतर चाणक्यचे सगळे रिमेक फ्लॉप झाले होते. त्यामुळे तब्बल २० वर्षानंतर येणाऱ्या चाणक्यच्या रिमेकसाठी मनीषला केस कापणं भागच होतं
पुढे मनीष वाधवा याविषयी म्हणाला- “मी विचार करत होतो की मी चाणक्य करत आहे, मला माझे केसही कापावे लागतील आणि लोक मला स्वीकारतील की नाही याची मला कल्पना नाही. व्यक्तिरेखा खूप चांगली होती कारण मला यापेक्षा मोठे पात्र मिळू शकणार नाही,
याची जाणीव होती. माझ्याकडे 2 वाजताचा कॉलटाईम होता. पण मी 12 वाजेपर्यंत माझे मुंडण केले नाही. मी विचार करत होतो की काही तरी कारण सांगून निघुन जावे."
मनीषने शेवटी सांगितले, "जेव्हा मी 12 वाजता सेटवर गेलो होतो, तेव्हा काही लोकं मला पाहून संतापले. त्यांनी विचारले की शुटींगची वेळ 2 वाजता आहे आणि मी माझे केस का कापले नाहीत? शॉटच्या आधी केस कापले तर ते स्क्रीनवर दिसतील.
त्यांचे बोलणे ऐकून मी धीर एकवटून मुंडण केलं. मला वाटले केस पुन्हा येतील पण चाणक्याची भुमिका पुन्हा सापडणार नाही. आज 12 वर्षे झाली तरीही माझे केस वाढू दिले नाहीत. चाणक्य मालिकेला 'हो' म्हटल्यानंतर माझे आयुष्य पूर्णपणे बदलले."
मनीष वाधवा यांनी गदर 2 मध्ये पाकिस्तानी पोलीस अधिकाऱ्याची भुमिका साकारलीय. मनीष वाधवा यांच्या भुमिकेचं सर्वत्र कौतुक होतंय.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.