Sonu Nigam News: अभिनेता आणि गायक असलेल्या सोनू निगमच्या बाबांच्या घरातून तब्बल ७२ लाखांची चोरी झाल्याचं प्रकरण उघडकीस आलं. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी आरोपीला कोल्हापुरातून अटक केली.
रमजान मुजावर असे अटक आरोपीचे नाव आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून पोलिसांनी 70 लाख 70 हजार रुपये जप्त केले आहेत.
(theft at sonu nigam's father's house in mumbai one arrested from kolhapur)
काय होतं नेमकं प्रकरण?
सोनू निगमची बहीण निकिताने याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली, त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. पोलीस अधिकाऱ्यांनी वक्तव्य केले कि, सोनू निगमच्या वडिलांचे वय 76 वर्षे आहे.
याप्रकरणी सोनू निगमच्या बाबांच्या माजी ड्रायव्हरवर घरातून ७२ लाख रुपये चोरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता कोल्हापुरातून अटक करण्यात आलेला आरोपी रमजान हाच तो ड्रायव्हर आहे का हे मात्र अद्याप कळू शकलं नाही
सोनू निगमची धाकटी बहीण निकिता हिने ओशिवरा पोलिस ठाण्यात चोरीची तक्रार दाखल केली.
तक्रारीनुसार, आगम कुमार निगमकडे यांच्याकडे एक ड्रायव्हर सुमारे 8 महिने काम करत होता, परंतु त्याचे काम योग्य नव्हते.
या कारणास्तव त्याला नुकतेच कामावरून काढून टाकण्यात आले. त्यामुळे रागाच्या भरात त्याने हे कृत्य केल्याची चर्चा आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, आगम कुमार निगम रविवारी वर्सोवा भागात मुलगी निकिताच्या घरी जेवायला गेले होते.
त्याच दिवशी संध्याकाळी त्यांनी आपल्या मुलीला फोनवरून सांगितले की, लाकडी कपाटात ठेवलेल्या डिजिटल लॉकरमधून 40 लाख रुपये गायब आहेत.
गायकाचे वडील आगम कुमार निगम हे ओशिवरा, अंधेरी पश्चिम, मुंबई येथे राहतात. आणि हि चोरी 19 मार्च ते 20 मार्च दरम्यान घडल्याचं सांगण्यात येतंय.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.