salman khan tiger 3 Esakal
मनोरंजन

Tiger 3 Box Office Collection: 'टायगर'ला पिंजऱ्यात बंद करण्याची वेळ आली! बॉक्स ऑफिस कलेक्शन घसरलं!

'टायगर 3' ने रिलीजच्या सहाव्या दिवशी म्हणजे शुक्रवारी किती कोटींचा गल्ला जमवला यावर नजर टाकूया

Vaishali Patil

Tiger 3 Box Office Collection Day 6: बॉलिवूडचा भाईजान सलमान खान आणि कतरिना कैफ स्टारर 'टायगर 3' ने दिवाळीच्या दिवशी बॉक्स ऑफिसवर एंट्री मारत मोठा बॉम्ब फोडला.

12 नोव्हेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झालेल्या टायगर 3' या चित्रपटाने पहिल्याच दिवशी देशभरात 44.5 कोटींच्या कलेक्शनसह धमाकेदार ओपनिंग दिली. मात्र त्यानंतर या चित्रपटाच्या कमाईचा आलेख सारखा खाली जाताना दिसत आहे.

बॉक्स ऑफिसवर 500 कोटींची कमाई करेल अशी आशा असलेल्या टायगरची कमाई गेल्या दोन दिवसात निम्म्याहून कमी झाली आहे. त्यातच आता 'टायगर 3' ने रिलीजच्या सहाव्या दिवशी म्हणजे शुक्रवारी किती कोटींचा गल्ला जमवला यावर नजर टाकूया...

ट्रॅकिंग वेबसाइट Sacnilk नुसार, दिग्दर्शक मनीश शर्माच्या चित्रपटाने शुक्रवारी बॉक्स ऑफिसवर केवळ 13 कोटी रुपयांची कमाई केली आहे. हे प्राथमिक आकडे असले तरी अधिकृत आकडे आल्यानंतर त्यात काही बदल होऊ शकतो. आता हे आकडे पाहता 'टायगर 3'ने सहा दिवसात 200.65 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे.

तर दुसरीकडे टायगर 3 ने जगभरात एकूण 297 कोटी रुपयांचे कलेक्शन केले आहे. त्यामुळे आता विकेंडला हा सिनेमा 300 कोटींचा टप्पा पार करेल अशी आशा निर्मात्यांनी व्यक्त केली आहे. सध्या सुरू असलेल्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचा फटका देखील या चित्रपटाला बसत असल्याच्या चर्चा आहे.

जरी 'टायगर 3' चित्रपटाची कमाई घसरत असली तरी हा चित्रपट 2023 चा 200 कोटींहून अधिक कमाई करणारा आणखी एक चित्रपट ठरला आहे. मात्र शाहरुख खानच्या पठाण, जवान आणि सनी देओलचा गदर 2 चा विक्रम मोडण्यासाठी 'टायगर 3'ला आणखी प्रतिक्षा करावी लागणार आहे.

यशराज फिल्म्सच्या बॅनरखाली आणि मनीष शर्माच्या दिग्दर्शनाखाली बनलेला 'टायगर 3' हा टायगर फ्रँचायझीचा तिसरा चित्रपट आहे. सलमान खान, कतरिना कैफ आणि इमरान हाश्मीशिवाय या चित्रपटात शाहरुख खान, हृतिक रोशनचा कॅमिओ देखील आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर रिलीज झालेला 'टायगर 3' आता किती कोटींचा गल्ला जमवतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: 17 तारखेला शिवाजी पार्कवर राज ठाकरेंची तोफ धडाडणार नाही, ठाकरेंनीच सांगितले सभा रद्द होण्याचे 'हे' कारण

Latest Maharashtra News Updates : काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत हे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या भेटीला

Women’s Health Tips : गर्भाशयाचा आजार असेल तर शरीरात दिसतात ही लक्षणं, अनेक महिला करतात दुर्लक्ष

Gaurav Nayakwadi : भावी मुख्यमंत्री पराजित होणार....गौरव नायकवडी यांची जयंत पाटील यांच्यावर नाव न घेता टीका

Winter Skincare: हिवाळ्यात त्वचा सतत कोरडी आणि निस्तेज वाटते? मग हे ६ उपाय वापरून घेऊ शकता तुमच्या त्वचेची काळजी

SCROLL FOR NEXT