Tiger 3 Salman Khan krk tweet viral esakal
मनोरंजन

Salman Khan : 'कितीपण लावा शक्ती 'टायगर ३' फ्लॉप होणारच'! 'तो' पुन्हा बोलला, यावेळी सलमान सोडणार नाही

युगंधर ताजणे

Tiger 3 Salman Khan krk tweet viral : बॉलीवूडचा भाईजान सलमान खान आणि कतरिना कैफ यांचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित टायगर ३ नावाचा चित्रपट येत्या दिवाळीत प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. नुकताच त्याचा ट्रेलरही व्हायरल झाला असून त्याला चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे.

१२ नोव्हेंबर रोजी टायगर ३ प्रदर्शित होणार आहे. त्याची कमालीची उत्सुकता चाहत्यांना आहे. सलमानचा चित्रपट म्हटल्यावर त्याच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता असते. या सगळ्यात भाईजानच्या चाहत्यांनी अॅडव्हान्स बूकींगची तयारी देखील आहे. त्यात प्रसिद्ध कलाकार आणि समीक्षकाच्या भूमिकेत असणाऱ्या केआऱके खाननं सलमानच्या आगामी टायगर ३ चित्रपटावरुन दिलेल्या प्रतिक्रियेची चर्चा होताना दिसत आहे.

यापूर्वी देखील कमाल राशिद खाननं सलमानच्या चित्रपटांवर दिलेल्या प्रतिक्रियेनं भाईजाननं त्याला चांगलीच समजही दिली होती. त्याच्या विरोधात कोर्टात धाव घेतली होती. त्याच्या विरोधात बदनामीची याचिकाही दाखल केली होती. अशावेळी आता पुन्हा कमाल खाननं सलमानला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. त्यातून त्यानं टायगर ३ वर दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आली आहे.

सलमानच्या टायगर ३ वर टिप्पणी करताना कमाल खान म्हणाला की, टायगर ३ ही एक यावर्षीची सगळ्यात फ्लॉप मुव्ही असणार आहे. केआरकेनं सलमानच्या वयावरुन देखील त्याला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला आहे. हॅशटॅग बुढा सलमान अशा प्रकारे त्याला हिणवलं आहे. या सगळ्यात पठाणमध्ये सलमानचा कॅमिओ होता. त्यानंतर शाहरुख देखील टायगर ३ मध्ये कॅमिओ करणार असल्याची चर्चा आहे.

दुसरीकडे ऋतिक रोशन आणि ज्युनिअर एनटीआऱ हे देखील सलमानच्या मुव्हीमध्ये चमकणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे त्याचा हा प्रोजेक्ट चाहत्यांसाठी महत्वाचा ठरणार आहे. काही दिवसांपूर्वी वॉर ३ चे पोस्टर प्रदर्शित झाले होते. केआरकेनं हॅशटॅग #TigerBuddhaHai असे म्हटले आहे. त्याची पोस्ट पाहून नेटकऱ्यांनी त्याच्यावर आगपाखड केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबईत लोकल ट्रेनचा डबा रुळावरुन घसरला; प्रवाशांचा खोळंबा

Eknath Shinde Helicopter: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थोडक्यात बचावले! हेलिकॉप्टरची इमर्जन्सी लँडिंग; काय घडलं नेमकं? जाणून घ्या

Champions Trophy 2025 : पाकिस्तानात या, खेळा अन् मॅच झाल्यावर झोपायला दिल्लीत जा! PCB चा टीम इंडियासमोर अजब प्रस्ताव

Vidhansabha Election 2024 : महायुतीत ४५ जागांच्या वाटपावर खल; जागा सोडण्यावरून स्थानिक पदाधिकारी आक्रमक

रणबीर- आलियाच्या बांद्रामधील घराची पहिली झलक समोर; नेटकऱ्यांनी केल्या भन्नाट कमेंट, म्हणाले- हे काय बनवलंय भाऊ..

SCROLL FOR NEXT