Tiger V/s Pathaan Update Esakal
मनोरंजन

Tiger V/S Pathaan मध्ये 'या' अभिनेत्रीची लागली वर्णी, दीपिका-कतरिनापैकी कोणाचा पत्ता कट? जाणून घ्या अपडेट..

पठाण ला मिळालेल्या यशानंतर आदित्य चोप्रानं 'टायगर व्हर्सेस पठाण' हा नवा स्पाय सिनेमा जाहीर केला आहे. यात एकच अभिनेत्री असेल अशा चर्चा देखील त्यानंतर रंगल्या होत्या.

प्रणाली मोरे

Tiger V/S Pathaan: शाहरुख खानच्या 'पठाण'ला मिळालेल्या यशानंतर खूश होऊन यशराज फिल्म्सनं आपल्या स्पाय युनिव्हर्सला एक पाऊल पुढे नेत नव्या सिनेमाची घोषणा केली आहे. यामध्ये सलमान खान आणि शाहरुख खानच्या 'टायगर व्हर्सेस पठाण' आणि हृतिक रोशनच्या 'वॉर २' सिनेमांचा समावेश आहे. 'टायगर ३' ची तयारी याआधीच करायला घेतली गेली आहे.(Tiger V/s Pathaan New Actress Entry deepika Padukone,Katrina Kaif who will be Out?)

यशराज फिल्म्सच्या स्पाय युनिव्हर्समध्ये दीपिका पदूकोण आणि कतरिना कैफ सारख्या अभिनेत्री आधीपासूनच सामिल आहेत. आता लेटेस्ट रिपोर्टनुसार बोललं जात आहे की राणी मुखर्जी,सैफ अली खान आणि सिद्धांत चतुर्वेदीसोबत 'बंटी और बबली २' मधनं बॉलीवूडमध्ये पदार्पण करणारी शर्वरी वाघ हिची स्पाय युनिव्हर्समध्ये लवकरच एन्ट्री होणार आहे. अशामध्ये आता प्रश्न उठत आहे की दीपिका आणि कतरिना असताना शर्वरी चं नाव समोर येतंय मग दीपिका-कतरिनापैकी कोणाचा पत्ता कट होणार आहे?

बोललं जात आहे की निर्माते आदित्य चोप्रा शर्वरी वाघविषयी सकारात्मक आहे आणि त्याचे म्हणणे आहे की शर्वरी खूपच टॅलेंटेड अभिनेत्री आहे आणि तिला स्पाय भूमिकेसाठी तयार केलं गेलं आहे.

तसंच दीपिका आणि कतरिना या दोघींपैकी कोणाचा पत्ता कट होणार यावर अधिकृतरित्या कोणतीच माहिती समोर आलेली नाही.

शर्वरी वाघविषयी बोलायचं झालं तर तिनं आपल्या करिअरची सुरुवात वयाच्या १६ व्या वर्षापासून केली होती. तिनं सुरुवातील अनेक जाहिरातीत कामं केली आहेत. तसंच, 'बाजीराव मस्तानी','प्यार का पंचनामा २' आणि 'सोनू के टीटू की स्वीटी' सिनेमात सहाय्यक दिग्दर्शक म्हणूनही काम पाहिलं आहे.

शर्वरी वाघनं अभिनय कारकिर्दीची सुरुवात वेब सीरिज 'फोरगॉटन आर्मी:आझादी के लिए' मधनं केली होती. यामध्ये ती सनी कौशल सोबत दिसली होती. माहितीनुसार कळंतय की शर्वरी सध्या सनी कौशलला डेट करत आहे..

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT