tik tok star dazhariaa aka dee dies by suicide hang herself wrote its my last post 
मनोरंजन

ही माझी शेवटची पोस्ट असं म्हणून केली आत्महत्या; 18 वर्षांची सेलिब्रेटी

सकाळ ऑनलाईन

मुंबई - अमेरिकन टिक टॉक स्टार डेझरिया शेफरनं आत्महत्या केल्यानं एका वेगळ्याच चर्चेला तोंड फुटले आहे. वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी तिनं आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. तिच्या अचानक जाण्यानं तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. शेफरनं आत्हत्यापूर्वी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली होती. त्यात तिनं आपल्या जाण्याबाबत सूचित केले होते. तिनं अशाप्रकारची पोस्ट का लिहिली, तिच्यावर काही दबाव होता का, याचा शोध पोलीस घेत आहेत.

शेफरनं असं पाऊल का उचलले याचा शोध सुरु आहे. तिचं जाणं हे तिच्या कुटूंबियांसाठी मोठा धक्का आहे. डेली मेलनं याबाबतचे सविस्तर वृत्त प्रसिध्द केले होते. त्यानंतर तिच्या पालकांनी जाऊन त्या बातमीची शहानिशा केली. डेझरियानं फेसुबकवर आपल्या आत्महत्येबाबत लिहिलं होतं. आपण लिहित असलेली माझी शेवटची पोस्ट आहे असे लिहिले होते. त्या पोस्टची टॅग लाईन ही लास्ट पोस्ट असे लिहिले होते. तिनं म्हटले, मला माहिती आहे की, मी तुम्हा सगळ्यांना खूप त्रास दिला आहे. त्याचा तुम्हाला मानसिक त्रास झाला. ही माझी शेवटची पोस्ट आहे. डेझरियाला फॉलो करणा-यांची संख्याही मोठी होती. एखाद्या मोठया सेलिब्रेटी सारखा तिचा वावर होता.

यु ट्युबवर ती Bxbygirlldee या नावानं ती प्रसिध्द होती. या नावावरुन तिला सोशल मीडियामध्ये ओळखले जात असे. याशिवाय ती एक चॅनेलही चालवत असे त्यावर ती आपले व्हिडिओज शेअर करत असे. डेली रिपोर्टनं प्रसिध्द केलेल्या माहितीनुसार, डेझरियानं सांगितले की, सोमवारी टिक टॉकनं तिचं अकाऊंट डिलीट केली होतं. मात्र ते करताना त्याच्याविषयी काहीही माहिती दिली नाही. मुलीच्या जाण्यानंतर वडिल म्हणाले, मला एवढेच म्हणायचे आहे ते म्हणजे डेझरियानं तिच्या जाण्यापूर्वी काही सांगितले असते तर बरे झाले असते. आम्ही दोघांनी चर्चा करुन तो प्रश्न सोडवला असता.

माझी मुलगी ही माझी चांगली मैत्रीण होती. ती खूप आनंदी होती. जेव्हा कामावरुन घरी यायचो तेव्हा मला पाहिल्यावर ती आनंदीत होत असे. तिच्या कठीण प्रसंगी तिनं मला सहभागी करुन घ्यायला हवे होते. मी नक्कीच त्याविषयी तिला मदत करू शकलो असतो. मला आता तिचा हात पकडता येणार नाही. मी जेव्हा घरी येईल तेव्हाही ती नसेल. आतापर्यत ज्यांनी माझ्या मुलीला सहकार्य केले त्यांना मी धन्यवाद देतो. 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT