प्रसिद्ध ब्रिटिश अभिनेता डेव्हिड वॉर्नर(David Warner) यांचे निधन झाले आहे. त्यांच्या कुटुंबियांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर कळत आहे की, गेल्या काही दिवसांपासून ते कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराशी झुंजत होते. आणि त्यातच त्यांनी जगाचा निरोप घेतला आहे. अभिनेता डेव्हिड वॉर्नर यांचे वय ८० वर्ष होते. त्यांनी हॉलीवूडच्या अनेक सिनेमांतून काम केले आहे, अभिनेता डेव्हिड वॉर्नर टायटॅनिक आणि ओमेन सारख्या सिनेमांसाठी अधिक ओळखले जातात. आपल्या शेवटच्या दिवसांत ते नॉर्थवूडच्या डेनव्हिल हॅलमध्ये राहत होते.(Titanic actor David Warner dies at 80 from cancer)
आपल्या माहितीसाठी इथे सांगतो की, डेव्हिड वॉर्नर यांनी जास्त खलनायकाच्या भूमिकाच साकारल्या आहेत. वॉर्नर हे १९७१ मधील सायकॉलॉजिक थ्रिलर स्ट्रॉ डॉग्स, १९७६ मध्ये आलेली हॉरर क्लासिक द ओमेन,१९७९ मधील टाईम- ट्रॅव्हल अॅडव्हेंचर टाईम आफ्टर टाईम आणि १९९७ मधील ब्लॉकबस्टर सिनेमा टायटॅनिक यातील भूमिकांसाठी कायम लक्षात राहतील. त्यांच्या मृत्यूनंतर कुटुंबियांनी एक निवेदनपत्र जारी करत म्हटलं आहे की, ते आमच्या कायम स्मरणात राहतील. ते खूप दयाळू व्यक्ति,उदारमतवादी होते. ते एक वडील म्हणून त्यांच्या कर्तव्यात कुठेच कमी पडले नाहीत. त्यांच्या जाण्यानं एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
लंडनमधील रॉयल अकादमी ऑफ ड्रामॅटिक आर्ट मध्ये अभिनयाचं शिक्षण घेतलेल्या डेव्हिड वॉर्नर यांनी हेनरी VI और किंग रिचर्ड II सारख्या भूमिका साकारल्या आहेत. १९६५ मध्ये पीटर हॉल द्वारा दिग्दर्शित हेमलेट ही लीड व्यक्तिरेखा साकारली होती. आपल्या अभिनयामुळेचे ते शेक्सपीयरच्या कंपनीचे तरुण तडफदार हरहुन्नरी अभिनेता म्हणून गौरविले गेले होते.
स्टेज आर्टिस्ट म्हणून नेहमीच त्यांची प्रशंसा करण्यात आली. डेव्हिड वॉर्नर यांनी सिनेमांव्यतिरिक्त टी.व्ही शोज मधूनही नही काम करुन लोकांची पसंती मिळवली आहे. त्यांना त्यांच्या काही भूमिकांसाठी ब्रिटिश अकादमीचं नॉमिनेशन देखील मिळालं होतं. १९८१ मध्ये टी.व्हीची मिनी सीरिज मसाडा मध्ये रोमन राजनकारणी पोम्पोनियस फाल्कोच्या भूमिकेसाठी त्यांना एमी पुरस्कार मिळाला होता.
अभिनेता डेव्हिड वॉर्नर १९९७ मध्ये रिलीज झालेल्या जेम्स कॅमरन यांच्या टायटॅनिक सिनेमातील भूमिकेसाठी कायम लक्षात राहतील. त्यांनी सिनेमात स्पाइसर लवजॉयची भूमिका साकारली होती. त्यांना त्यांच्या १९७६ मध्ये रिलीज झालेल्या द ओमेन मधील फोटोग्राफर कीथ जेनिंग्स या भूमिकेनं खूप फेम मिळवून दिलं होतं.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.