tmkoc, jenifer mistry on nattu kaka crying on set, ghanashyam nayak 
मनोरंजन

TMKOC: नट्टू काका सेटवर अनेकदा रडलेत, रात्रभर.. तारक मेहता मधील रोशन भाभीचा खळबळजनक खुलासा

तारक मेहता मधील रोशन भाभी म्हणजेच अभिनेत्री जेनिफर मिस्त्री हिने नट्टू काका यांना सेटवर किती त्रास दिला जायचा, याचा खुलासा केलाय

Devendra Jadhav

TMOKOC Jenifer Mistry on Nattu Kaka News: तारक मेहता का उल्टा चष्मा मालिका सध्या विविध कारणांमुळे चर्चेत आहे. तारक मेहता मधील अनेक कलाकार शोच्या निर्माते आणि दिग्दर्शकांवर वेगवेगळे आरोप करत आहेत.

तारक मेहता मधील रोशन भाभी म्हणजेच अभिनेत्री जेनिफर मिस्त्री हिने तारक मेहता मधील नट्टू काका यांना सेटवर किती त्रास दिला जायचा, याचा खुलासा केलाय. तो ऐकून सर्वांना धक्का बसलाय.

(TMKOC fame Roshan Bhabhi's jenifer mistry sensational revelation that Nattu Kaka cried many times on set)

जेनिफरने स्पष्ट केले की तिने निर्माते असित कुमार मोदी यांना नट्टू काका म्हणजेच घनश्यामला वाईट वागणूक देताना कधीही पाहिले नाही, परंतु शोचे प्रॉडक्शन हेड सोहिल रमाणी यांनी मात्र घनश्याम यांना वाईट वागणूक दिली आहे.

जेनिफरने तारक मेहताचे ऑपरेशन आणि प्रोडक्शन हेड सोहिल रमानी वर गंभीर आरोप केले आहेत, 'सोहिल नट्टू काकांशी अत्यंत अपमानास्पद वागायचा.

आम्ही सर्वांनी नट्टू काकांना अनेकदा रडताना पाहिले आहे. मोनिका म्हणजेच बावरीने एकदा मला सांगितले की नट्टू काका खूप रडत आहेत आणि म्हणत आहेत की सोहिल त्याच्या पापांची उत्तरे देईल.

नट्टू काकांना फक्त सुट्टी हवी होती आणि सोहिल त्यांची सुट्टी वारंवार पुढे ढकलत होता." असा खुलासा जेनिफरने केला.

जेनिफर मिस्त्री पुढे खुलासा केलाय की.. सेटवर बालकलाकारांनी खूप त्याग केला आहे. लहान मुलं निमूटपणे काम करायचे. त्यांची या गोष्टीबद्दल कोणतीही हरकत नव्हती.

याशिवाय अभिनेत्रीने नट्टू काका उर्फ ​​घनश्याम नायक यांचाही उल्लेख केला. जरी तो आता आपल्यात नाही. त्यांचे निधन झाले आहे. पण अभिनेत्रीने दावा केला आहे की, अनेकवेळा नट्टू काका सेटवर रडायचे.

गेली अनेक वर्ष तारक मेहता का उलटा चष्मा मालिका TRP मध्ये टॉपवर आहे. गेल्या काही महिन्यात तारक मेहता मधील अनेक प्रमुख कलाकार मालिका सोडून गेले आहेत. त्यामुळे या चांगल्या मालिकेला कोणाचीतरी नजर लागली असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

बॉक्सर इमाने खलीफ पुरूष असल्याचा वैद्यकिय रिपोर्ट समोर येताच Harbhajan Singh ची 'गोल्ड मेडल' परत करण्याची मागणी

IPL Auction 2025 : १५७४ खेळाडूंची नोंदणी, पण २०४ जणांनाच लागणार लॉटरी! ६४१ कोटींचं बजेट; जाणून घ्या सर्व डिटेल्स

SCROLL FOR NEXT