Toby Keith Died Sakal
मनोरंजन

Toby Keith Died : प्रसिद्ध अमेरिकन पॉपस्टार 'टोबी किथ'नं घेतला अखेरचा श्वास! कॅन्सरनं झालं निधन

The famous American popstar 'Toby Keith' took his last breath, Died from cancer; वयाच्या अवघ्या ६२ व्या वर्षी जगाचा निरोप घेणाऱ्या टोबीच्या जाण्यानं त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

युगंधर ताजणे, सकाळ ऑनलाईन टीम

Toby Keith Died: हॉलीवूडमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. आपल्या आगळ्या वेगळ्या धाटणीच्या गायकीसाठी ओळखला जाणाऱ्या टोबी किथचं निधन झालं आहे. कॅन्सरनं त्याचा मृत्यू झाल्याचे (Toby Keith Passed Away 62 age ) सांगण्यात येत आहे. त्याच्या जाण्यानं हॉलीवूडवर मोठी शोककळा पसरली आहे.

टोबीच्या गाण्यांची जादू ही त्याच्या चाहत्यांच्या मनावर कायम आहे. वयाच्या अवघ्या ६२ व्या वर्षी जगाचा निरोप घेणाऱ्या टोबीच्या जाण्यानं त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. तो गेल्या काही दिवसांपासून आजारी असल्याचे सुत्रांनी सांगितले. त्याला पोटाचा कर्करोग झाला होता. टोबीच्या निधनानंतर हॉलीवूडच्या अनेक सेलिब्रेटींनी त्याला आदरांजली वाहिली आहे.

अमेरिकन पॉपस्टार म्हणून टोबीची वेगळी ओळख होती. तो त्याच्या वेगळ्या गाण्यांसाठी नेहमीच चर्चेत राहिला. त्याची गायकी, वेगळं सादरीकरण यामुळे त्याचा चाहतावर्गही मोठा होता. सोशल मीडियावर त्याला फॉलो करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. आता टोबीच्या जाण्याची बातमी ऐकताच सोशल मीडियावर त्याच्या असंख्य चाहत्यांनी त्याला आदरांजली वाहिली आहे. टोबीच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरुन त्याच्या निधनाची बातमी देण्यात आली आहे.

टोबीच्या करिअरविषयी सांगायचे झाल्यास, ९०च्या दशकांतील या गायकानं त्याच्या वेगळ्या शैलीमुळे मोठी लोकप्रियता मिळवली होती. त्याचं पहिलं गाणं शुड हॅव बीन ए काऊबॉय हे खूपच लोकप्रिय झाले होते.वेगवेगळ्या देशांमध्ये ते आवडीनं ऐकलं जात होतं. त्यानंतर ९९ साली आलेल्या हाऊ डू यू लाईक मी नाऊ या गाण्यानं मोठी लोकप्रियता मिळवली होती.

टोबीच्या वेगवेगळ्या अल्बमची ४० मिलियनपेक्षा जास्त विक्री झाल्याचे सांगण्यात येते. त्याच्या जाण्यानं हॉलीवूडमध्ये मोठ्या प्रमाणात शोककळा पसरली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harshvardhan Patil: पवारांची साथ मिळूनही हर्षवर्धन पाटलांसाठी निवडणूक सोप्पी नाही? घरातूनच बसला धक्का

Pune News : नव्या पाहुण्यासाठी हवा सरकारी दवाखाना; खासगीपेक्षा अधिक पसंती, अडीच वर्षांत ६९ हजार प्रसूती

Sakal Podcast: अमेरिकेत ट्रम्प येणार की हॅरिस? ते अर्जुन तेंडुलकर CSK च्या जर्सीत दिसणार?

आपापल्या उमेदवारांसाठी ‘हे’ १७ बडे नेते सोलापुरात! पंतप्रधान मोदी, राहुल गांधी, शरद पवार, योगी, रेवंथ रेड्डी, सिद्धरामय्या, उद्धव व राज ठाकरे, ओवैसी यांच्या प्रचारसभा, वाचा...

कौटुंबिक वारसा जपताना...

SCROLL FOR NEXT