Tollywood: kamal Haasan tweet..said,'big thing about hindi language' Google
मनोरंजन

Kamal Haasan: 'हा तर निव्वळ मुर्खपणा..'; हिंदी भाषेला टार्गेट करत कमल हासन यांचे वादग्रस्त ट्वीट

राहूल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत सहभागी झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी कमल हासन यांनी हिंदी भाषेवर केलेलं ट्वीट त्यांना अडचणीत आणण्याची शक्यता आहे.

प्रणाली मोरे

Kamal Haasan: केवळ दाक्षिणात्य सिनेमेच नाहीत तर बॉलीवूड इंडस्ट्रीवर देखील आपली छाप सोडणारे सुपरस्टार कमल हासन आपल्या दमदार अभिनयासोबतच बेधडक वक्तव्यांसाठी देखील ओळखले जातात. कमल हासन सध्या त्यांच्या एका वक्तव्याला घेऊन पुन्हा चर्चेत आलेले पहायला मिळत आहेत. सुपरस्टारने हिंदी भाषेविषयी मोठं विधान केलेलं आहे. जे कदाचित त्यांना अडचणीत आणू शकतं. कमल हासन यांनी केरळ सांसद जॉन ब्रिटास यांचा एक व्हिडीओ री-ट्वीट केलं आहे. (Tollywood: kamal Haasan tweet..said,'big thing about hindi language')

या व्हिडीओला री-ट्वीट करत कमल हासन यांनी म्हटलं आहे की, ''दुसरी भाषा शिकणं किंवा हा सगळ्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. हिंदी भाषेची दुसऱ्यांवर सक्ती करणं हा निव्वळ मुर्खपणा आहे. आणि हिंदी भाषेची जी काही सक्ती केली जातेय त्याचा विरोध केला जाईल''. अभिनेत्यानं आपलं ट्वीट तामिळ भाषेत पोस्ट केलं आहे. सीपीआई-एम चे सांसद जॉन ब्रिटॉसने आपला व्हिडीओ ट्वीट करत त्याला कॅप्शन देत लिहिलं होतं की,''या देशात हिंदी भाषेची सक्ती सगळं काही बर्बाद करून टाकेल. जर सुंदर पिचाईनी आयआयटी ची परिक्षा हिंदी मध्ये दिली असती तर ते गूगलचे हेड बनू शकले असते?''

त्यानंतर जॉन ब्रिटॉसचं ट्वीट रीट्वीट करत कमल हासन यांनी आपला मुद्दा मांडत लिहिलं आहे की,''हेच केरळ नेहमी दाखवत आलं आहे आणि हे अर्ध्याहून अधिक भारताला लागू होते. सावनधान...पोंगल जवळ येत आहे...ओह..माफ करा..जागते रहो...तुम्हाला समजावं म्हणून''.

माहितीसाठी इथे सांगतो की, राहूल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत कमल हासन सहभागी झाले होते. कमल हासन यांनी हिंदी भाषेवर केलेलं ट्वीट हे ठीक भारत जोडो यात्रेत सहभागी झाल्यानंतर एक दिवसानं केलंय. यात्रेत सहभागी झाल्या दरम्यान लाल किल्ल्यावर झालेल्या जनसभेत कमल हासन यांनी भाषण देखील केलं होतं. दिल्लीतील जनतेला संबोधित करताना कमल हासन यांनी ना हिंदीत,ना इंग्लिशमध्ये तर चक्क तामिळ मध्ये भाषण केलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT