''कांतारा'' हा या वर्षाचा सुपरहिट सिनेमा ठरलाय हे काही वेगळ सांगायची गरज नाही. या चित्रपटाने तर सर्व रेकॉर्ड मोडत जगभरात 200 कोटींहुन जास्त कमाई केली आहे.या सिनेमाला 9.4 रेटिंग मिळालं आहे.कन्नड सिनेसृष्टीतच काय तर सर्व जगभरात सध्या या चित्रपटाची चर्चा सुरु आहे.
या चित्रपटाला अनिल कुंबळे, प्रभास, प्रशांत नील, विवेक रंजन अग्निहोत्री, सुपरस्टार रजनीकांत ते भारताचे युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर आणि आतापर्यंत विविध क्षेत्रातील मान्यवरांचे खूप प्रेम आणि पाठिंबा मिळाला आहे. ज्याही सेलिब्रिटिंनी कांतारा पाहिला ते या चित्रपटाबद्दल बोलण्यापासुन स्वत:ला रोखू शकलेले नाही. या चित्रपटाची क्रेझ पाहून चक्क अध्यात्मिक गुरु श्री श्री रवी शंकर यांनीही हा चित्रपट पाहिला.
त्यांच्या ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ या बंगळुरूच्या आश्रमांमध्ये रवी शंकर आणि त्यांच्या अनुयायांसाठी या चित्रपटाच्या स्पेशल स्क्रीनिंगचे आयोजित करण्यात आले होते. हा चित्रपट पाहिल्यानंतर त्याबद्दल त्यांनी प्रतिक्रिया दिली.
हा खुप मोठा विजय असल्याचं म्हणत 'कंतारा'च्या निर्मात्यांनी त्यांच्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात श्री श्री रविशंकर यांच्या बेंगळुरू येथील आश्रमाची झलक दाखवली आहे, जिथे गुरुदेवांनी त्यांच्या भक्तांसोबत 'कंतारा' पाहिला. त्याने कॅप्शनमध्ये आभाराची नोट देखील लिहिली - "#कांतारा चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी आम्ही गुरुजी @SriSri चे आभार मानतो. @BangaloreAshram मध्ये चित्रपट प्रदर्शित करणे हे आमच्या चित्रपटाचं सौभाग्य समजतो. संस्कृतीशी जोडलेले राहण्याची आमची इच्छी आहे आणि या परंपरांना पुढे नेण्याचा मी प्रयत्न करत राहणार आहे” असं त्यांनी यात म्हटंलय
ऋषभ शेट्टीनं 'कांतारा' या चित्रपटाचा सर्वेसर्वा आहे अंस म्हटंल्यास त्यात काही वावगं ठरणार नाही. त्याने या चित्रपटाची निर्मीती,कथानक,दिग्दर्शन आणि अभिनयही केला आहे. या सिनेमानं बॉक्सऑफिसवर धूमाकुळ घातला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.